esakal | कऱ्हाडकरांनाे! पैसे वाचवायचे आहेत? तीन अटींची अंमलबजावणी करा

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडकरांनाे! पैसे वाचवायचे आहेत? तीन अटींची अंमलबजावणी करा}

यंदा अर्थसंकल्पात पाणी, घरपट्टीत वाढ सुचवलेली नाही. त्याशिवाय अन्य कोणत्या करातही वाढ नाही. याउलट ग्रीन बिल्डिंगला वेगवेगळ्या कपात सवलत मिळत आहे.

कऱ्हाडकरांनाे! पैसे वाचवायचे आहेत? तीन अटींची अंमलबजावणी करा
sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड ः शहरतील ज्या मिळकतधारकांची इमारत, घर हरीतसह पर्यावरणपूरक आहे. त्यांना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा देऊन त्यांच्या विविध करांत किमान पाच टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याचा ठराव पालिका आज (गुरुवारी) होणाऱ्या अर्थसंकल्पीय सभेत मांडणार आहे. यंदा पाणी, घरपट्टीच्या करात वाढ प्रस्तावित नाही. त्यासोबतच हरित व पर्यावरण पूरक मिळकतधारकांना करात कपात देण्याचा निर्णयही होणार आहे. 

शहरात 20 हजार 44 मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडे कर वसुलीही सुरू आहे. त्या मिळकतधारकांसाठी चांगली संधी पालिकेने दिली आहे. ज्या मिळकतधारकांच्या इमारती पर्यावरण पूरक आहेत. त्या इमारतींना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा देऊन त्या मिळकतधारकांना प्रत्येक करात सूट देण्याचा महत्त्वाचा निर्णय पालिका घेत आहे. तो ठराव पालिका उद्या होणाऱ्या अर्थसंकल्पीय बैठकीत मंजूर होणार आहे. इमारतींना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा देऊन त्या इमारतींच्या मालकांना पाणी, घरपट्टीसह अन्य करामध्ये सूट देण्यात येणार आहे. ती सूट किमान पाच टक्‍क्‍यांपर्यंत असणार आहे. अर्थसंकल्पात पाणी, घरपट्टीत वाढ सुचवलेली नाही. त्याशिवाय अन्य कोणत्या करातही वाढ नाही. याउलट ग्रीन बिल्डिंगला वेगवेगळ्या करात सवलत मिळत आहे. 

अशी ठरणार ग्रीन बिल्डिंग 

पालिकेने ग्रीन बिल्डिंग ठरविण्यासाठी संबंधित मिळकतधारकांना तीन अटी घातल्या आहेत. त्यामध्ये संपूर्ण इमारत सोलर सिस्टिमवर चालणारी हवी, इमारतीमध्ये पावसाचे पाणी संकलन व त्याचा पुनर्वापर प्रकल्प पाहिजे. इमारतींमध्ये कचरा निर्मूलन अथवा कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प पाहिजे, या तीन अटी आहेत. त्या इमारतींना ग्रीन बिल्डिंगचा दर्जा दिला जाणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

तोंड लपवत पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पुण्यासह, बारामतीच्या जुगाऱ्यांवर साताऱ्यात गुन्हा दाखल

धक्कादायक! पहिल्या बायकोस टीव्ही आणण्यास नेल्याने दूसरीने दिला जीव 

तुम्हांला असा अनुभव येत असेल तर जरुर लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयास संपर्क साधा

नवरी साेबत फोटो काढून येईपर्यंत कोणीतरी त्यांची पर्स लांबवली होती

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए असेच घडले की हाे...

Edited By : Siddharth Latkar