केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; महाबळेश्वर-पाचगणीला जाण्यासाठी आज पसरणी घाट बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard

केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; पसरणी घाट रस्ता आज बंद

केळघर (जि. सातारा) : महाबळेश्वरवरून केळघरला येताना एका प्रवाशाला साेमवारी साडेअकराच्या सुमारास काळाकडा येथे एका वळणावर बिबट्याचे दर्शन झाले. या प्रवाशाने या बिबट्याला अगदी जवळून पाहात आपल्या मोबाईलमध्ये त्याला कैद केले आहे. (satara-marathi-news-mahableshwar-tourist-leopard-kelghar-ghat)


केळघर घाटात वरोशी, रेंगडी परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार अनेकांनी पाहिलेला आहे. बिबट्याने कित्येकदा शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्लेही केले आहेत. काळाकडा या घाटात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रस्त्यावरून सुरक्षित प्रवास करणे अवघड झाले आहे. अशातच जर अचानक समोर बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याचे दर्शन झाले, तर दुचाकीवरील प्रवाशांची काय अवस्था होईल? याचा विचारही करता येत नाही.

हेही वाचा: 'कृष्णा'साठी 91 टक्के चुरशीने मतदान; गुरुवारी होणार मतमोजणी

केळघर घाटातून रात्रभर वाहतूक सुरू असते. साेमवारी रात्री साडेअकरा वाजता महाबळेश्वरहून केळघरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून एका प्रवाशाला अवघड वळणावर अचानक रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाले. प्रवाशाने गाडी थांबवून त्याचे व्हिडिओ चित्रण केले व छायाचित्रेही घेतली.

बिबट्या शांतपणे रस्ता ओलांडून खालील जंगलात गेला. या रस्त्याने दुचाकीस्वारांना प्रवास करणे धोक्याचे झाले आहे, तसेच या परिसरातील शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांनाही धोका आहे. गेल्या वर्षी कुरुळोशी, वरोशी, वाटंबे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले झाले होते. बिबट्याच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: जावळीतील क्रीडा संकुलासाठी कुडाळकरांचे शिवेंद्रराजेंना साकडे

पसरणी घाट बंद महाबळेश्वला आज केळघर घाटातून वाहतुक

दरम्यान वाईहून पाचगणी- महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट रस्ता आज (बुधवार) दिवसभर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंक काम सुरु राहणार असल्याने पाचगणी, महाबळेश्वरकडे होणारी वाहतूक वाई- सुरूर- पाचवड- सातारा- मेढा-केळघर घाट मार्गे महाबळेश्वर याबराेबरच वाई- सुरूर- पाचवड- मेढा- केळघर घाट मार्गे महाबळेश्वर तसेच सुरूर- वाई- उडतारे- कुडाळ- पाचगणी महाबळेश्वर अशी वळविण्यात आली आहे.

loading image
go to top