esakal | शाहूपूरी, विलासपूरवासियांची सत्ताधा-यांकडून दिशाभूल : मोने, मोहितेंचे शरसंधान

बोलून बातमी शोधा

शाहूपूरी, विलासपूरवासियांची सत्ताधा-यांकडून दिशाभूल : मोने, मोहितेंचे शरसंधान}

अर्थसंकल्पात अनेक बाबींचे उल्लंघन झाले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असा कोणताही उपक्रम यात दिसत नसून वाढीव भागातील विकासकामांसाठी भरीव तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत.

शाहूपूरी, विलासपूरवासियांची सत्ताधा-यांकडून दिशाभूल : मोने, मोहितेंचे शरसंधान
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : पालिकेने मांडलेला हा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ आकडेवारीचा खेळ असून, तो पत्त्याच्या बंगल्यासारखा आहे. सामान्य नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करत दिशाभूल करणारा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते अशोक मोने आणि नगरसेवक अमोल मोहिते यांनी नुकतीच केली.
 
याबाबतचे पत्रक त्यांनी दिले असून, यात सातारकरांच्या विकासासाठी दूरदृष्टीचा अभाव असणारा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प शिलकी नसून तोट्यातील, तसेच लेखासांहिता नियमांचे भंग करणारा आहे. या अर्थसंकल्पावर आम्ही काही हरकती नोंदविल्या आहेत, त्याचा विचार होणे आवश्‍यक आहे. महिला व बालकल्याणसाठीचा निधी पूर्ण खर्च व्हावा, जाहिरातकरांचे फेर सर्वेक्षण व्हावे, प्राधिकरणाच्या देयक रकमेचा यात कोठेही उल्लेख केलेला नाही. अर्थसंकल्पात अनेक बाबींचे उल्लंघन झाले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असा कोणताही उपक्रम यात दिसत नसून वाढीव भागातील विकासकामांसाठी भरीव तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत. विविध विकासकामांसाठी निधी तरतूद केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी त्यातून नेमकी कोणती कामे होणार याचा कोणताही गोषवारा त्यात नाही.

शाहूपुरी, विलासपूरसह अन्य भागांच्या विकासासाठी भरीव तरतूद : कदम, शेंडेंचा दावा

राजवाडा पालिकेच्या मालकीचा नसून त्याठिकाणी आर्ट गॅलरी उभारण्यासाठी संमती घेतली आहे का, याची कोणतीही नोंद अर्थसंकल्पात नसल्याचा आरोपही मोने, मोहिते यांनी पत्रकाद्वारे केला आहे. (कै.) आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्या नावे सुरू असणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात आली असून, सत्ताधारी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राजकरण करत आहेत. लेखासंहितेचे भंग करणारा हा अर्थसंकल्प दुरुस्त करून पुन्हा मांडावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

मार्चमध्ये मिलिटरी कॅंटीन चार दिवस राहणार बंद; कमांडर राजेंद्र शिंदेंची माहिती

विश्रामगृहाची ताबडतोब दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन; भाजपचा प्रशासनाला कडक इशारा 

डाॅ. शिंदेंचे अपहरण? नेमका काय घडला प्रकार वाचा सविस्तर

साताऱ्यात कृषी स्वावलंबन योजनेतून तब्बल 120 विहिरी पूर्ण; कृषी विभागाची माहिती

पैसे टाका; ऊसतोडणी करा! साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

Edited By : Siddharth Latkar