पाचगणी- महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाट रस्ता उद्या वाहतुकीसाठी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road closed

पाचगणी- महाबळेश्वरला जाणारा पसरणी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

वाई (जि. सातारा) : वाईहून पाचगणी- महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट रस्ता बुधवारी (ता. ३०) दिवसभर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, येथील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली. (satara-marathi-news-pasarni-ghat-closed-wednesday-mahableshwar-panchgani)

जाधव यांनी याबाबतचे पत्र वाईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना यांना दिले आहे. या पत्रात पोलादपूर- महाबळेश्वर- वाई-वाठार- भाडळे- बुध- राजापूर- दहिवडी रस्ता राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: पर्यटकांना खुशखबर! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर, पाचगणी सोमवारपासून सुरु

पसरणी घाटातील मोरी व भिंती अतिवृष्टीमुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतिपथात आहे. रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी बुधवारी (ता. ३०) सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंतच्या कालावधीसाठी एक दिवसाकरिता रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.

हेही वाचा: बेभरवशाच्या कांद्याने केले मालामाल! २२०० रुपयांचा खाताेय भाव

या कालावधीमध्ये पाचगणी, महाबळेश्वरकडे होणारी वाहतूक वाई- सुरूर- पाचवड- सातारा- मेढा- महाबळेश्वर, वाई- सुरूर- पाचवड- मेढा- महाबळेश्वर, तसेच सुरूर- वाई- उडतारे- कुडाळ- पाचगणी महाबळेश्वर अशी वळविण्यात यावी, असे प्रांताधिकारी कार्यालयाला कळविले आहे.

Web Title: Satara Marathi News Pasarni Ghat Closed Wednesday Mahableshwar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..