'कॉंग्रेसच्या विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर राहा'

'कॉंग्रेसच्या विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर राहा'
Updated on

विंग (जि. सातारा) : प्राथमिक आरोग्य केंद्र ते ग्रामीण रुग्णालय असा आरोग्य विभागाचा मूलभूत पाया रचण्याची कामगिरी केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारने केली होती. देशातील आरोग्याची मूलभूत सुविधा भक्कम असल्याने कोरोनाच्या महामारीला यशस्वीपणे तोंड दिले. पुरोगामी विचार वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत, असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
 
पोतले (ता. कऱ्हाड) येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी पाच लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्‌घाटन व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील-उंडाळकर, प्रदेश कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य अजितराव पाटील-चिखलीकर, कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगलताई गलांडे, पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, पोतलेच्या सरपंच वैशाली माळी उपस्थित होत्या.

उदयसिंह पाटील म्हणाले, ""आगामी निवडणुकांत कॉंग्रेसची ताकद दुसऱ्यांकडे गहाण ठेवल्यास विरोधक आपणास देशोधडीला लावतील. व्यक्तिगत स्वार्थासाठी कुणाबरोबर न जाता कॉंग्रेसचा विचार आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्यांबरोबर राहा. विलासकाका व पृथ्वीराजबाबा यांनी मतदारसंघातील सरंजामशाही प्रवृत्तींना बाजूला ठेवण्यासाठी मतदारसंघात पायाभूत सुविधा व वैचारिक विकास केला आहे.''

मनोहर शिंदे, डॉ. आबासाहेब पवार, अशोकराव पाटील, शंकरराव खबाले यांची भाषणे झाली. सरपंच वैशाली माळी, माजी सरपंच रामचंद्र पाटील यांनी स्वागत केले. अंकुश नांगरे यांनी प्रास्ताविक केले. दिलीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पवार यांनी आभार मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com