काेराेनाचा बाजार थांबवा! युवकाचे जिल्हा रुग्णालयाबाहेर आंदाेलन

जाेपर्यंत हा बाजार संपत नाही. जाेपर्यंत सरकार वठणीवर येत नाही. तसेच जनता जागृत हाेत नाही ताेपर्यंत आंदाेलन सुरुच ठेवणार असल्याचे माेहितेने स्पष्ट केले.
ganesh mohite
ganesh mohitesystem

सातारा : सातारा शहरानजीकच्या डबेवाडी, शहापूर तसेच जकातवाडी येथे काेविड 19 चे रुग्ण (covid 19 patient) वाढत आहे. डबेवाडीत माेठ्या संख्येने रुग्ण असल्याने तेथे आयसाेलेशन सेंटर (isolation center) उघडले पाहिजे परंतु प्रशासनासह सामाजिक संस्था लक्ष देत नसल्याने जकातवाडी (ता. सातारा) येथील महेश माेहिते याने जिल्हा रुग्णालय (general hospital) येथे शनिवारपासून आंदाेलन सुरु केले आहे. जाेपर्यंत शासन सर्वसामान्यांना न्याय देत नाही ताेपर्यंत आपण आंदाेलन करणार असल्याचे माेहितेने स्पष्ट केले आहे. (satara marathi news youth agitation isolation center)

महेश म्हणाला, जकातवाडी (ता. सातारा) येथील मी असून गेले दाेन महिने स्वतःहून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि जंम्बाे काेविड 19 येथे स्वयंसेवक म्हणून लाेकांना मदत करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या भागातील डबेवाडी येथे काेराेनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी (ता. 14) आमच्या भागासाठी एक बैठक झाली.

ganesh mohite
जीव गेल्यास गप्प बसणार नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा इशारा

डबेवाडीत 65 रुग्ण आहेत. परंतु त्यांच्यासाठी उपचाराची व्यवस्था उभी केली जात नाही. ज्या पद्धतीने प्रयत्न झाले पाहिजेत ते हाेत नसल्याने मी आंदाेलनास बसलाेय. आमच्या भागात काेविड सेंटर, आयसाेलेशन सेंटर तसेच लसीकरण केंद्र सुरु व्हावे यासाठी माझे आंदाेलन आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हे आंदाेलन आहे. मला माहिती आहे इंथ काय चाललंय. कशा प्रकारे बाजार चालला आहे. जाेपर्यंत हा बाजार संपत नाही. जाेपर्यंत सरकार वठणीवर येत नाही. तसेच जनता जागृत हाेत नाही ताेपर्यंत आंदाेलन सुरुच ठेवणार असल्याचे माेहितेने स्पष्ट केले.

ganesh mohite
युवकांच्या हदयातील नेता आम्ही गमावला; पृथ्वीराज चव्हाण भावुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com