सातारा : असा मामा प्रत्येक गावाला भेटायला हवा : सुबराव पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुबराव पाटील

सातारा : असा मामा प्रत्येक गावाला भेटायला हवा : सुबराव पाटील

दहिवडी : पोपटराव मलिकनेर यांना संपुर्ण मार्डी गाव आदराने मामा म्हणते. या मामाने गावासाठी कोट्यावधींचा निधी आणला आहे. त्यामुळे असा मामा प्रत्येक गावाला भेटायला हवा. मात्र मामाचा 'मामा' होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या असे प्रतिपादन साताऱ्याचे माजी जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांनी केले.

मार्डी (ता. माण) येथे तुळजा भवानी माता मंदीर परिसर सुशोभीकरण व ग्रामसचिवालय बांधकाम या कामांच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी एम.आय.डी.सी. महाराष्ट्रचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव मलिकनेर, जावलीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, विशेष कार्य अधिकारी औदुंबर पाटील, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, ह्रदयरोग तज्ञ डाॅ. केशव काळे, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, काकासाहेब देसाई, संजय राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

सुबराव पाटील म्हणाले, अंतर्गत हेवेदावे बाजूला सारून गावाच्या विकासासाठी सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. गावाच्या विकासासाठी पोपटराव मलिकनेर यांच्या सोबत ठामपणे रहा. सर्वांनी माणुसकी जपा कारण माणूसकी असते तिथं विकास होतोच. ग्रंथालय ही देवळं आहेत तर शाळा हे मंदिरं आहे. त्यासाठी मी उत्तमोत्तम पुस्तकं भेट देणार आहे.

सोनाली पोळ म्हणाल्या, तात्यांची मार्डी, मार्डीचे तात्या ही ओळख कायम ठेवून आदर्श मार्डीकडे गावाची वाटचाल सुरु आहे. डाॅ. संदीप पोळ म्हणाले, मतभेद दूर सारुन मार्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

राजेंद्र पोळ म्हणाले, मार्डीने बिनविरोध ग्रामपंचायत करुन अशक्यप्राय गोष्ट शक्य केली आहे. तात्यांनी जो पाया रचला त्यावर कळस चढविण्याचं काम पोपटराव मलिकनेर यांच्या माध्यमातून सुरु आहे. डाॅ. केशव काळे म्हणाले, महिला सदस्यांनी केलेल्या व प्रस्तावित कामाचा आढावा ज्या पध्दतीने दिला ते पाहून अभिमान वाटला.

उपसरपंच संजीवनी पवार यांनी प्रास्ताविक केले. सरपंच संगीता दोलताडे, ग्रामपंचायत सदस्या अक्षता लोखंडे, रुपाली महामुनी, सारिका जाधव यांनी कामांचा आढावा दिला. आप्पासाहेब गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले तर अॅड. सीमा पोळ यांनी आभार मानले.

दानशूरांचे सत्कार

जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना टाकीसाठी गोविंद मोहिते यांनी दहा गुंठे, गावठाण स्मशानभूमीसाठी झुंजार वस्तीतर्फे नंदकुमार पोळ यांनी पाच गुंठे जागा, देशमुख वस्ती स्मशानभूमीसाठी संजय देसाई यांनी एक गुंठा तर कचरा व्यवस्थापनासाठी सनी गायकवाड यांनी एक गुंठा जागा दान दिल्याबद्दल या सर्व दानशूरांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Web Title: Satara Mardi Village Subrao Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top