सातारा : माथाडींचे प्रलंबित प्रश्न सोडविणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

सातारा : माथाडींचे प्रलंबित प्रश्न सोडविणार

ढेबेवाडी: राज्य शासनाच्या कामगार, गृह, पणन, सहकार यासह अन्य खात्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नांची काही दिवसांच्या कालावधीत सोडवणूक करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिली.माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने मुंबईतील आझाद मैदानावर कालपासून धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले होते.

संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीला माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, युनियनचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, सहकार व वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार विभागाचे उपसचिव डॉ. श्रीकांत पुलकुंडवार, पणन विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदीप देशमुख, सहकामगार आयुक्त (माथाडी) लोखंडे, विविध माथाडी बोर्डाचे अध्यक्ष व अधिकारी उपस्थित होते.नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा आढावा बैठकीत घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे पाऊल उचलावे लागल्याचे सांगितले.

Web Title: Satara Mathadi Pending Issues Resolved

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top