कुमठ्यात एकाच दिवसात मिनी कोरोना केअर सेंटर सुरू

राजेंद्र वाघ 
Saturday, 19 September 2020

कुमठे गावातील नागरिकांना इतरत्र रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांना गावातच विनामोबदला ऑक्‍सिजन, प्राथमिक औषधोपचार, वाफरा अशा सुविधा मिळणार असून, महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या माध्यमातून रुग्णांच्या मनातील भीती, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. 

कोरेगाव (जि. सातारा) : कुमठे (ता. कोरेगाव)  ग्रामपंचायतीने गावातील रुग्णांसाठी चार बेडचे मिनी कोरोना केअर सेंटर उभारले आहे. कुमठ्याचे सुपुत्र व पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या संकल्पनेतून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत एकाच दिवसात ग्रामपंचायतीने चार ऑक्‍सिजन यंत्रणेसह रुग्णांसाठी स्वतंत्र चार बेड, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट, तपासणी उपकरणे खरेदी करून गावातील मुरलीधर मंदिरात हे सेंटर उभे केले आहे. 

MarathaReservation : तर मी राजीनामा देईन : उदयनराजे

ऑक्‍सिजन वाचून गावातील काही नागरिकांचा बळी गेला आहे, त्यातूनच केअर सेंटर उभारण्याचा निर्णय सरपंच रत्नमाला क्षीरसागर, उपसरपंच जितेंद्र जगदाळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी घेतला. त्यासाठी सभापती जगदाळे यांनी मदत दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, तडवळे आरोग्य केंद्राचे डॉ. सागर वाघमारे, डॉ. राजीव अरलुरकर, डॉ. नितीन जाधव यांनी सेंटरसाठी मार्गदर्शन केले.

लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलंच असतं : उदयनराजे गरजले

गावातील नागरिकांना इतरत्र रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांना गावातच विनामोबदला ऑक्‍सिजन, प्राथमिक औषधोपचार, वाफरा अशा सुविधा मिळणार असून, महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या माध्यमातून रुग्णांच्या मनातील भीती, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. या सेंटरचे लोकार्पण सरपंच क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. जितेंद्र जगदाळे, ग्रामविकास अधिकारी आबासाहेब बर्गे, उपसरपंच जितेंद्र जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील जयवंत जगदाळे, राजेंद्र जवळेकर, सरला जवळेकर, उज्ज्वला अरलुलकर, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

माथाडी कामगार चळवळीला उपमुख्यमंत्री-कामगारमंत्र्यांचं पाठबळ : आमदार शशिकांत शिंदे

अरलूलकर कुटुंबीयांकडून जागा 

कुमठे गावातील ज्येष्ठ समाजसेवक, आचार्य विनोबा भावे यांचे अनुयायी (कै.) श्रीधर सखाराम अरलूलकर ऊर्फ मास्तर मामा यांच्या वार्षिक कृतज्ञता दिनानिमित्त अरलूलकर कुटुंबीयांनी कोरोना केअर सेंटरसाठी श्री मुरलीधर मंडप येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राजीव अरलूलकर यांच्यासह अरलूलकर कुटुंबीयांचे आभार मानत सभापती जगदाळे यांनी आगामी काळात श्रीधर अरलूलकर यांच्या नावाने कृषी पुरस्कार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही याप्रसंगी दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mini Corona Care Center In Kumthe On The Same Day