esakal | गृहराज्यमंत्री म्हणाले... सरकार स्थापन झालं अन्‌ नशिबी कोविड आलं
sakal

बोलून बातमी शोधा

karad

शिवसेनेची गाडी राजधानी एक्‍स्प्रेसप्रमाणे वेगाने धावायला हवी. आपले सरकार स्थापन झाले आणि नशिबी कोविड आले. त्यामुळे हे संकट टळल्यावर सर्वांनी कामाला लागूया, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

गृहराज्यमंत्री म्हणाले... सरकार स्थापन झालं अन्‌ नशिबी कोविड आलं

sakal_logo
By
रविकांत बेलाेशे

भिलार (जि. सातारा) : बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जावळीने सदाशिव सपकाळ यांच्या रूपाने शिवसेनेचा जिल्ह्यातील पहिला आमदार दिला. सध्या वातावरण चांगले आहे, त्यामुळे पक्षवाढीचे काम सर्वांना करायचे आहे. भविष्यात सगळा जिल्हा भगवा करायचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाची हीच खरी भेट ठरेल, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. 

करहर (ता. जावळी) विभाग शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, सातारा- जावळी मतदारसंघाचे संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, विठ्ठलदादा पवार, संदीप पवार, विक्रम तरडे, बाळू यादव, विक्रांत गावडे, रवी पारटे आदी उपस्थित होते. 
श्री. देसाई म्हणाले, ""आपली गाडी सुरू आहे; पण पॅसेंजरच्या वेगाने आपणाला राजधानी एक्‍स्प्रेसचा वेग हवाय. जशी मुंबई ते दिल्ली 14 तासांत जाते. त्याच वेगाने आपल्या पक्षाची गाडी राजधानी एक्‍स्प्रेसप्रमाणे वेगाने धावायला हवी. आपले सरकार स्थापन झाले आणि नशिबी कोविड आले. त्यामुळे हे संकट टळल्यावर सर्वांनी कामाला लागूया.'' 

या वेळी सदाशिव सपकाळ, एकनाथ ओंबळे यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरात 112 दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास नितीन गोळे, बापू गोळे, नरेंद्र पवार, उमेश दुर्गावले, प्रकाश गोळे, मनोज पवार, शंकर सनस, संजय गोळे, रवी गोळे, अमरदीप तरडे, लहुराज सुर्वे, बाळासाहेब शिर्के, सचिन शेलार, दीपक पवार, प्रशांत जुनघरे, विक्रम तरडे उपस्थित होते. सखाराम साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रांत गावडे यांनी स्वागत केले. रवी पार्टे यांनी आभार मानले 

(संपादन ः संजय साळुंखे) 

जावळीतील या दुर्गम गावात सामुहिक शेतीचा नारा