सातारा : बेपत्ता मुलीची तक्रारच आली अंगलट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 woman Missing

सातारा : बेपत्ता मुलीची तक्रारच आली अंगलट

क ऱ्हाड : तालुक्यातील एका गावातील या घटनेचे अनेक परिणाम झाले. मात्र, प्रत्यक्षात आई-वडीलच संशयित निघाले. त्यावेळी मात्र सारेच चक्रावले. पोटची मुलगी बेपत्ता आहे, तिला एकाने फूस लावून पळवल्याची तक्रार वडिलांनी पोलिसात दिली होती. मात्र, पोटची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यापूर्वीच आई-वडिलांनीच तिचा खून करून मृतदेह पवारवाडीच्या डोंगरात पुरला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासह त्यांनी अन्य एकाला यात अडकविण्याचे नियोजन केले होते.

मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेसह खबऱ्याच्या जागरूकतेने खरा प्रकार अवघ्या आठ दिवसांत उजेडात आला. त्यादिवशी सायंकाळी संबंधित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी त्यात लक्ष घालून तपासाच्या सूचना केल्या. सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते, फौजदार दीपज्योती पाटील व हवालदार धनंजय कोळी यांच्याकडे तपासाची धुरा सोपविली.

तपासातील शिलेदार

पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते, सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, फौजदार दीपज्योती पाटील, सहायक फौजदार खाडे, हवालदार धनंजय कोळी, उत्तम कोळी, गणेश वेदपाठक, सज्जन जगताप, तेजाली चव्हाण, संजय काटे, दीपक घाडगे, युवराज खाडे, कृष्णा खाडे, संजय सपकाळ, पोलिस पाटील जयश्री पवार, उषा पाटील, सतीश भिसे, संभाजी पवार, प्रकाश शिनगारे, दीपक तोडकर.

आई-वडिलांनीच पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याच्या कऱ्हाड तालुक्यातील घटनेने पोलिसांसह तालुका हादरला. बेपत्ता मुलीची १० दिवसांनी तक्रार देणारे आई-वडीलच संशयित निघाल्याने पोलिसही चक्रावले. बेपत्ता झालेल्या मुलीला एकाने फूस लावून पळवल्याची वडिलांनी पोलिसात दिलेली तक्रारच त्यांना भोवली. अवघ्या आठवड्यात पोलिसांनी मोठ्या परिश्रमाने तपास करून डोंगरात पुरलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढला. त्यामुळे नराधम माता-पित्यासह मुलीच्या मामाचाही बुरखा फाटला. हातात कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी कुशलतेने केलेला तपास गुन्ह्याची उकल करण्यात महत्त्‍वाचा ठरला.

- सचिन शिंदे, कऱ्हाड

Web Title: Satara Missing Girl Complaint Lodged Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top