कोरेगावात "मिशन ऑक्‍सिजन' सुरू, लोकसहभागातून रुग्णसेवेचा निर्धार

Satara
Satara
Updated on

कोरेगाव (जि. सातारा) : कोरेगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ऑक्‍सिजनची कमतरता आणि रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत आम्ही कोरेगावकर ऑक्‍सिजन ग्रुपच्या माध्यमातून "मिशन ऑक्‍सिजन' सुरू केले असून, रुग्णांना तातडीची गरज म्हणून मोफत ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून देण्यास प्रारंभ केला आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, काही रुग्णांना ऑक्‍सिजनअभावी जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटना, व्यावसायिकांसह दानशूर व्यक्तींना स्वयंचलित ऑक्‍सिजन यंत्रणा उभारणीसाठी आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत भैरवनाथ फाउंडेशन व कोरेगाव नगर विकास कृती समितीच्या वतीने ज्येष्ठ मार्गदर्शक सी. आर. बर्गे यांनी एक ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून दिले आहे.

नागरिकांना मदतीसाठी आवाहन केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पहिले ऑक्‍सिजन मशिन देणगी स्वरूपात मिळाले असून, ते गरजूंसाठी लगेचच जागेवर नेऊन संबंधितांना उपलब्ध करून दिले आहे. दरम्यान, गरजूंना ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यासाठी कोरेगावातील सर्व जनतेला पुढे येण्याचे आवाहन केल्यानंतर मदत स्वरूपात सुमारे एक लाख 20 हजारांचा निधी आम्ही कोरेगावकर ऑक्‍सिजन ग्रुपकडे जमा झाला आहे.

शहरातील रुग्णांसाठी ऑक्‍सिजन मशिन्स मोफत उपलब्ध करून देण्यात येत असून, त्याचा लाभ गरजूंनी घ्यावा, दानशूर नागरिकांनी या लोकोपयोगी उपक्रमासाठी आपला खारीचा सहभाग लोकवर्गणी अथवा ऑक्‍सिजन मशिन देऊन करावा, असे आवाहन आम्ही कोरेगावकर ऑक्‍सिजन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. 

Edited By : Pandurang Barge  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com