सातारा : आता साखर सम्राटांना घाबरू नका

आमदार गोरे म्हासुर्णेत साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन, शेतकऱ्यांपुढे वर्धन ॲग्रोचा पर्याय
साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजन
साठवण बंधाऱ्याचे भूमिपूजनsakal

औंध : आजपर्यंत म्हासुर्णे भागात उसाच्या जिवावर राजकारण केले जात होते. ऊस गाळपासाठी नेताना तो कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आहे, हे बघितले जात होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी दबून राहून तथाकथित सहकार सम्राट, साखर सम्राट यांनाच राजकीय सहकार्य करत होते. परंतु, धैर्यशील कदमांनी वर्धन ॲग्रो कारखान्याच्या रूपाने एक सक्षम पर्याय उभा केला आहे. त्यामुळे आता कोणी या गोष्टीला भिऊ नका, असे आवाहन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

म्हासुर्णे (ता. खटाव) येथे जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळ सदस्या सुनीता धैर्यशील कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या यमगरवस्ती येथील साठवण बंधाऱ्याचा भूमिपूजन तसेच पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमशील कदम यांच्या माध्यमातून मिळालेल्या व्यायामशाळा साहित्याचा लोकार्पण सोहळा या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वर्धन ॲग्रो कारखान्याचे अध्यक्ष, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते धैर्यशील कदम, वडूजचे नगरसेवक सोमनाथ जाधव, ओंकार चव्हाण, वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, उपसरपंच विठ्ठल माने, धोंडिराम पोपळकर, अनिल पवार, दादासाहेब घार्गे उपस्थित होते.

यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, ‘‘बऱ्याच दिवसांची म्हासुर्णेकरांची साठवण बंधारा व व्यायामशाळा साहित्याची मागणी आज पूर्ण करताना आनंद होत आहे. घर चालवायला जसा कर्ता माणूस सक्षम लागतो, तसे आपले लोकप्रतिनिधीही सक्षम पाहिजेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अजिबात चिंता करू नये. तुमच्या शेतातील उसाचे शेवटचे कांडके गाळपास नेत नाही, तोपर्यंत वर्धन कारखाना बंद करणार नाही.’’

विक्रमशील कदम यांचेही भाषण झाले. वडगाव विकास सेवा सोसायटीच्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. विश्वास माने यांनी सूत्रसंचालन केले. पै. तुषार माने यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com