यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झटकली गेली मरगळ

महेश बारटक्के
Wednesday, 10 June 2020

गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने शशिकांत शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गेल्या काही महिन्यांत काहीसा कमी झाली होता. मात्र, विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केल्याचे पाहावयास मिळाले.

कुडाळ (जि.सातारा) : विधान परिषदेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार शशिकांत शिंदे यांचे निवडीनंतर प्रथमच जावळी तालुक्‍यात आगमन झाले. तत्पूर्वी हुमगावसह कुडाळ व ठिकठिकाणी फटाक्‍यांच्या आतषबाजीत त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
 
कार्यकर्त्यांच्या कायम गराड्यात असणारे शशिकांत शिंदे आपल्या कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्याचाही नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्याचाच प्रत्यय नुकताच त्यांनी जावळीतील मैदानात उतरून दाखवून दिला. कुडाळ येथे आल्यानंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तेथून पुढील दौऱ्यासाठी जात असताना शशिकांत शिंदे यांच्या जवळच्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या नवीन वाहनाची राईड बाजार समितीच्या प्रांगणात मारण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी त्यांना केला. तेव्हा शशिकांत शिंदे यांनी स्पोर्टस वाहनाचे स्टेअरिंग हातात घेत, जावळीतील मैदानावर राईड, तर मारलीच; पण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील स्पर्धेसाठी नव्या इनिंगचाही फर्स्ट गिअर टाकला.
 
गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी आलेली मरगळ यानिमित्ताने झटकली गेली, तसेच कार्यकर्त्यांना खुमासदार शैलीचे दर्शन घडवत त्यांनी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व घोषणाबाजीही केली. 

शिंदेंचा जोश कायम 
 
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने शशिकांत शिंदेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गेल्या काही महिन्यांत काहीसा कमी झाली होता. मात्र, विधान परिषदेवर आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केल्याचे पाहावयास मिळाले. आमदार शिंदे यांचे जावळीत आगमन होताच त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांच्या प्रेमाने, उत्साहाने आमदार शिंदे यांच्याही चेहऱ्यावर तोच जोश यानिमित्ताने दिसून आला.

सातारा : 'या' तालुक्याने ओलांडला काेराेना बाधितांचा दोनशेचा टप्पा

असा करा कोरोना विषाणूचा मुकाबला 

राष्ट्रवादीत कही खुशी, कही गम...

उदयनराजे... सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जातोय!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MLC Member Shashikant Shinde Recently Visited Jawali Taluka