जलमंदिर तुमच्यासाठी सदैव खुले आहे, काेणाला म्हणाले उदयनराजे वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

प्रारंभी यशस्वीतांना खासदार उदयनराजेंच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे आणि एक रोप प्रदान देऊन सत्कार करण्यात आला.

सातारा : लाखो परिक्षार्थींमधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तुमची निवड झाली आहे. ही झालेली निवड म्हणजे तुमच्या प्रयत्नांना मिळालेले यश, तुमच्या पालकांची पुण्याई आणि समाजाचे नशिब समजुन, पुढील प्रशासकीय नोकरीच्या माध्यमातुन जनतेची अविरत सेवा करावी, तुम्हाला काहीही समस्या-प्रश्‍न निर्माण झाले तर आम्ही सदैव सहकार्याकरीता तत्पर आहोत. जलमंदिर हे सर्व जनतेचे घर आहे. सर्वसामान्य जनतेमुळे आमचे राजेपण आहे, जनतेसह तुम्हा सर्वांना जलमंदिर सदैव खुले आहे असे मार्मिक गौरवोदगार, खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
Video : एमपीएससी परीक्षेत यशस्वी हाेण्यासाठीचा प्रसाद चाैगुलेंचा कानमंत्र

उदयनराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा परिक्षेत उज्जवल यश मिळवलेल्या सातारा जिल्हयातील एकूण 30 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जलमंदिर पॅलेस, येथील दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते.  

प्रारंभी यशस्वीतांना खासदार उदयनराजेंच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सातारी कंदी पेढे आणि एक रोप प्रदान देऊन सत्कार करण्यात आला. खासदार उदयनराजे म्हणाले समाजाची सेवा करण्याकरीता प्रशासकीय अधिका-यांना फार मोठी संधी आहे. खडतर परिश्रम करुन एमपीएससी परिक्षेत यश मिळवलेल्या आपण सर्वांनी आपल्या नोकरीच्या कार्यकाळात, निरपेक्ष भावनेने कार्य करावे. जनतेची सेवा करणा-या अधिका-यांना आपला आदर्श मानुन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी सत्कारमुर्तीपैकी राज्यात पहिला आलेले प्रसाद चौगुले, प्रगती कटटे, चैतन्य कदम, श्‍वेता खाडे, राहुल गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. महाराज साहेबांना भेटायचे होते, हा दिवस नेहमीच स्मरणात राहील, अशा स्वरुपाचे विचार व्यक्त करुन, आयोजित सत्काराबद्यल आभार मानले.
अकरावी प्रवेशासाठी मराठा जात प्रमाणपत्र असे काढा
 
संतोष कणसे यांनी प्रास्ताविक केले. संग्राम बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती सुनील काटकर, पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर, संग्राम बर्गे, शिरिष चिटणीस, अमित कुलकर्णी, पंकज चव्हाण, विनित पाटील व मित्रसमुहाचे सदस्य उपस्थित होते.

सातारा : पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची लाॅकडाउनची भूमिका जाहीर

सातारकरांनाे उद्या 'या' भागात पाणी येणार नाही

सर्व रेशनकार्डधारकांना 31 जुलैपर्यंत मिळणार या याेजनेचा मोफत लाभ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara MP Udayanraje Bhosale Felicitated MPSC Successful Student In Satara