
सातारा : सातारा शहर व परिसरातील शासकीय तसेच खासगी मोकळ्या जागांवर बंद अवस्थेत असलेल्या टपऱ्या, हातगाड्या उभ्या करून जागा बळकावू पाहणाऱ्यांची आज पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे चांगलीच तारांबळ उडाली. आज दिवसभराच्या कारवाईत पालिकेने आठ बंद टपऱ्या व इतर साहित्य जप्त केले.