सातारा नगरपालिकेच्‍या प्रशासकपदी अभिजित बापट

सातारा पालिकेच्‍या कार्यकारिणीची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्‍याने नगराध्‍यक्षांसह सर्व पदाधिकारी पदावरून पायउतार झाले आहे.
Abhijit Bapat
Abhijit BapatSakal
Updated on

सातारा : कार्यकारिणीची मुदत संपल्‍याने शासन आदेशानुसार सातारा नगरपालिकेच्‍या (Satara Municipality) प्रशासकपदी मुख्‍याधिकारी अभिजित बापट (Abhijit Bapat) यांची नगरविकास विभागाने नियुक्‍ती केली. निवडणुका (Election) होऊन नवीन कार्यकारिणी अस्तित्‍वात येईपर्यंत त्‍यांच्‍याकडे हा कार्यभार राहणार आहे.

सातारा पालिकेच्‍या कार्यकारिणीची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्‍याने नगराध्‍यक्षांसह सर्व पदाधिकारी पदावरून पायउतार झाले आहे. सातारा पालिकेच्‍या कार्यकारिणीची मुदत संपली असून त्‍याठिकाणीही नगरविकास विभागाच्‍या आदेशाने प्रशासकांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. काल (ता. २७) रात्री घोषणा झाल्‍यानंतर आज सकाळी मुख्‍याधिकारी बापट यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत प्रशासकपदाचा कारभार हाती घेतला. पालिकेचा दैनंदिन कारभार सुरळीत चालावा, यासाठी सर्व विभागप्रमुखांचा सहभाग असणाऱ्या कार्यकारी समितीची लवकरच बापट यांच्‍याकडून घोषणा होणार आहे.

Abhijit Bapat
सातारा : टोल चुकवेगिरीला ‘फास्टॅग’मुळे लागला लगाम

ओबीसी आरक्षणाचा तिढा वाढल्‍याने राज्‍य शासनाने सर्वच निवडणुका चार महिने पुढे ढकलण्‍याचा ठराव अधिवेशनात संमत केला आहे. त्यामुळे सातारा पालिकेसह जिल्‍ह्‍यातील सर्वच पालिकांच्‍या निवडणुका चार महिने पुढे जाण्‍याची शक्‍यता आहे. या शक्‍यतेमुळे मार्चमध्‍ये पालिका निवडणुकांसाठीच्‍या आचारसंहितेची घोषणा होण्‍याचा अंदाज पालिका प्रशासनाने वर्तवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Major Boost for Tiger Conservation: Wildlife Board Revived After 13 Years in Maharashtra
Milk Adulteration Suspected After Panic Disposal Following FDA Raid Rumour
FDA raid rumour in Satara
Koyna Dam water level today
Marathi News Esakal
www.esakal.com