सातारा पालिकेतील भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाका; शिवेंद्रसिंहराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे; मंत्री पवार व शिंदेंमुळेच प्रशासकीय इमारतीला निधी
satara municipality Corruption Innovative Satara Shivendra Raje Bhosale
satara municipality Corruption Innovative Satara Shivendra Raje Bhosalesakal
Updated on

सातारा : पाच वर्षे केलेला भ्रष्ट कारभार लपविण्यासाठी ‘इनोव्हेटिव सातारा’ या गोंडस आणि अर्थहीन शब्दाखाली सत्ताधाऱ्यांचा भुलभुलैया सुरू आहे. नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. पालिकेत चांगले प्रशासन आणण्यासाठी सातारकरांनी हा भ्रष्ट ‘कचरा’ बाहेर टाकण्याची वेळ आली आहे. सातारा शहराची आणि पालिकेची वाट लावणाऱ्या सत्ताधाऱ्यांना येत्या निवडणुकीत सातारकरांनी घरचा रस्ता दाखवावा, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

गेल्या पाच वर्षांत सातारा पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सातारकरांच्या पैशांची अक्षरशः लूट केली, असा आरोप करून शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘‘टेंडर, टक्केवारी, कमिशनसाठी सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या कळवंडी, एकमेकांचे गळे धरण्याचे लाजीरवाणे प्रकार पाहण्याची वेळ नागरिकांवर आली. सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी या सर्व प्रकारावर नेहमीच पांघरून घालून भ्रष्ट कारभार सुरूच ठेवला. आता सातारकारांमधून संताप व्यक्त होऊ लागल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. सत्ताधाऱ्यांचा डाव सातारकरांनी ओळखल्यामुळेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ‘इनोव्हेटिव सातारा’ असा भूलभुलैया सुरू झाला.

उपमुख्यमंत्र्यांनी सातारकरांना भरभरून दिले आहे. कास धरण उंची वाढ, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने श्री. पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावले. आता पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी श्री. पवार आणि श्री. शिंदे यांनी निधी दिला. भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत नागरिकांनी भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून भ्रष्टाचाराला आळा घालावा, असे आवाहन त्यांनी केले.

नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत सुसज्ज आणि चांगली होईल; पण प्रशासन चांगले असणे आवश्यक आहे, याचा सातारकरांनी गांभीर्याने विचार करणे काळाची गरज आहे.

- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com