ही पालिका लॉकडाउन; कर्मचारी क्‍वारंटाइन, कामांचे काय?

karad
karad

भिलार (जि. सातारा) : पाचगणी नगरपालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने कार्यालय कुलूपबंद झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

पाचगणी पालिका कार्यालयात 30 जुलै रोजी महिला नगरसेविकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. त्याअगोदर एकदिवस या नगरसेविका पालिकेच्या बैठकीला हजर होत्या. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. काही नगरसेवक स्वतःहून क्‍वारंटाइन झाले. पालिका प्रशासनाने सर्व कार्यालयात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेतले. दुसऱ्या दिवशी पालिकेतील दोन कार्यालयीन कर्मचारीही कोरोनाबाधित झाल्याचे रिपोर्ट आल्याने आणखी गुंता वाढला. संसर्ग वाढतो की काय, अशी भीती निर्माण झाली. इतर कर्मचाऱ्यांनाही क्‍वारंटाइन करण्यात आले आणि नगरपालिकेचे कामकाज थांबवण्यात आले. नंतर एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला. शेवटी पालिकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले. 

सध्या पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना क्‍वारंटाइन केले असून कार्यालय बंद असल्याने नागरिकांची कामेही ठप्प झाली आहेत. कोरोनाच्या भीतीने नागरिकही पालिकेकडे फिरकण्यास धजावत नाहीत. 


नगरपालिकेचे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने बरेचसे कर्मचारी क्‍वारंटाइन केले आहेत. परंतु, पालिकेचे कामकाज थांबवले नसून गरजेनुसार कर्मचारी जावून काम करीत आहेत. 

- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com