सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील निधीत हेराफेरी!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ओझर्डे धबधबा व रामबाण येथे पर्यटनाला चालना मिळावी, म्हणून जिल्हा नियोजन समितीने दिलेला 30 लाख निधी परस्पर प्रकल्पाच्या कोअर झोनमधील मेट इंदोली व अवसरीत वापरला आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या तत्कालीन उपसंचालक डॉ. विनिता व्यास यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याबाबत पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे, नाना खामकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना दिले आहेत. 

श्री. भाटे, श्री. खामकर यांच्या तक्रारीनुसार डॉ. व्यास यांनी परस्पर वर्ग केलेल्या निधीमुळे त्याचा गैरवापर झाला आहे. त्याबाबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी डॉ. व्यास यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये ती नोटीस बजावली आहे. श्री. गुजर यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये पर्यटन विकासासाठी आलेला निधी डॉ. व्यास यांनी परस्पर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये वापरला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये पर्यटन निधी खर्च करू नये, या सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण निर्देशाचा भंग झाला आहे. परस्पर निधी फिरवण्याने जिल्हा नियोजन समितीची फसवणूक व दिशाभूल झाली आहे. 

याप्रकरणी जिल्हा नियोजन समितीने सह्याद्री व्याघ्रला दिलेल्या पर्यटन विकासाचा निधी अखर्चित का राहिला, अखर्चित निधी उपसंचालकांनी सह्याद्री व्याघ्र फाउंडेशनमध्ये वर्ग का केला, ओझर्डे धबधबा व रामबाण येथील विकासाला आलेला निधी परस्पर इतरत्र का वळवला, मेट इंदोली, अवसरी येथे पर्यटन निधी वापरण्यासाठी कोणाची परवानगी घेतली, आदी चौकशी होणार आहे. 

""देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या कोअर झोनमध्ये पर्यटन विकासाचा निधी वापरता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देश आहेत. मात्र, तरीही अखर्चित निधी येथे कोअरमध्ये वापरला गेला. त्याची कसून चौकशी व्हावी तसेच तो निधी डॉ. व्यास यांच्याकडून वसूल करण्यात यावा.'' 

-रोहन भाटे, 
पर्यावरण अभ्यासक, कऱ्हाड 

संपादन : पांडुरंग बर्गे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com