Raj Thackeray vs Shambhuraj Desai
esakal
सातारा : किल्ले परिसरात येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा असुविधांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठीच राज्य शासनाने काही किल्ल्यांच्या पायथ्याशी नमो पर्यटक सुविधा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या खात्याच्या अखत्यारीत असून, त्याविषयी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आरोप केले आहेत. त्यांचे हे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याची टीका पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शुक्रवारी सातारा येथील पत्रकार परिषदेत केली.