esakal | Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले 'माेदीं'चे पेढे
sakal

बोलून बातमी शोधा

Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले 'माेदीं'चे पेढे

उपमुख्यमंत्री पवारांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न तडीस नेण्याचा निर्धार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढीव जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आता उद्या (गुरुवारी, ता. 2) साताऱ्यातील लोकप्रतिनिधींसोबत ते बैठक घेऊन कॉलेजचा आराखडा अंतिम करणार आहेत.

Video : राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चाखले 'माेदीं'चे पेढे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजसाठी लागणारी जादा 60 एकर जागा  जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कृष्णा खोऱ्याकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. या वेळी श्री. पाटील यांच्यासमवेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवकचे अध्यक्ष तेजस शिंदे उपस्थित होते. याचा आनंदोत्सव सर्वांनी एकमेकांना पेढा भरवून साजरा केला.
 
मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न प्रलंबित आहे. हा प्रश्‍न आघाडी, नंतर युती आणि आता महाविकास आघाडीचे सरकार आले तरी मिटलेला नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले. त्या वेळी त्यांच्यापुढे हा प्रश्‍न आमदारांनी उपस्थित केला. यावर त्यांनी सर्व अधिकाऱ्यांसह तत्कालीन पालकमंत्र्यांनाही कानपिचक्‍या दिल्या; पण कोणत्याही परिस्थितीत साताऱ्याचे मेडिकल कॉलेजचे काम सुरू करण्याचा निर्धार त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केला. त्यानुसार सध्याच्या 25 एकर जागेत आणखी 60 एकर जागा मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना त्यांनी सूचना केली होती. काल दुसऱ्याच दिवशी रात्री उशिरा जयंत पाटील साताऱ्यात आले. त्यांनी कृष्णा खोऱ्याची तब्बल 60 एकर जागा वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडे हस्तांतरित केली. याबाबतची कागदोपत्री पूर्तता झाल्यानंतर जयंत पाटील यांनी स्वत:च्या हाताने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनाही त्यांनी पेढा भरविला.

सातारी कंदी पेढ्यांची परंपरा जाेपासणारे मिठाई व्यावसायिक माेदींच्या दुकानातील पेढे चाखताना नेते मंडळींमध्ये मेडिकल काॅलेजच्या जागेच्या प्रश्न सुटल्याचा आनंद हाेता. दरम्यान उपमुख्यमंत्री पवारांनी मेडिकल कॉलेजचा प्रश्‍न तडीस नेण्याचा निर्धार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वाढीव जागेचा प्रश्‍न मिटला आहे. आता उद्या (गुरुवार, ता. 2) साताऱ्यातील लोकप्रतिनिधींसोबत ते बैठक घेऊन कॉलेजचा आराखडा अंतिम करणार आहेत. 

उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे भेटले अन् माध्यमांनी उदयनराजेंना छेडले

साताऱ्यात एकच दिवस अजित पवार आले अन्...