मदत मिळताच आनंदली या गावातील गरजू कुटुंबे

karad
karad
Updated on

विंग (जि. सातारा) ः तारुख (ता. कऱ्हाड) येथील तारुख सामाजिक विकास संस्था ही गरीब-गरजूंच्या मदतीसाठी धावून आली. कोरोना संकटात 120 कुटुंबांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करताना आधार दिला. संकटसमयी हातात मदत मिळताच ही कुटुंबे आनंदून गेली. 

तारुखमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 48 वर गेला आहे. हे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. 16 जूनला पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून गाव लॉक झाले आहे. त्यास महिना उलटला. अद्यापही परिस्थिती बिकट आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. गावावर आलेल्या संकटाची जाणीव ठेऊन या कुटुंबाच्या मदतीला सामाजिक विकास संस्था धावून आली. संस्थेचे बहुतांश सदस्य पुणे-मुंबईला नोकरीस आहेत. अन्य व्यवसायात असताना नेहमीप्रमाणे व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. बघता-बघता 60 हजार रुपयांची मदत गोळा झाली. त्यातून जीवनावश्‍यक वस्तू खरेदी केल्या. त्याची किट तयार केली. एकीची भावना जपताना गरीब-गरजूंना त्यांचे वाटप केले. 

ही मदत पोचवण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आनंदा भिसे, उपाध्यक्ष संदीप कुराडे यांनी नियोजन केले. संस्थेचे सदस्य संग्राम ताटे, नंदकुमार भिसे, जयवंत पाटील, नीलेश कुराडे, अनिल भिसे, सखाराम टेळे, विजय डिसले, विकास शेवाळे यांच्यासह अन्य सदस्यांनी वाटप्रसंगी सहकार्य दिले. सरपंच प्रियांका गुरव, उपसरपंच दत्ता पाटील, ग्रामसेवक विशाल पाटील, पोलिस पाटील सतीश भिसे, सचिन कुराडे, आनंदा शेवाळे, कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष सचिन कुराडे यांच्यासह ग्रामस्थांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. 

पुणे-मुंबईत राहूनही गावाविषयी ओढ असणाऱ्या या संस्थेने जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट देऊन शैक्षणिक साहित्य दिले आहे. ग्रामस्वच्छता अभियान, कोल्हापुरी बंधारा दुरुस्ती, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Pink Visitors Spotted at Koyna Backwaters, Boosting Eco-Tourism
MVA Eyes Dissatisfied Mahayuti Leaders; Jayant Patil Calls for a Political Upset
Shaurya Chakra for Satara Officer Who Led Mission Eliminating Nine Militants
Utkarsha Jadhav Emerges Best Trainee Officer, Receives Coveted Revolver Trophy
Marathi News Esakal
www.esakal.com