कऱ्हाडातील पाटणात 18 ग्रामपंचायती बिनविरोध; तालुक्‍यात 775 उमेदवार रिंगणात

कऱ्हाडातील पाटणात 18 ग्रामपंचायती बिनविरोध; तालुक्‍यात 775 उमेदवार रिंगणात
Updated on

पाटण (जि. सातारा) : तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतींपैकी 18 ग्रामपंचायती पूर्ण बिनविरोध झाल्या आहेत. त्यातील 17 ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध आहेत. शेवटच्या दिवशी 476 उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतल्याने एक हजार 144 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यातील 369 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रत्यक्ष 775 उमेदवार रिंगणात असून, 72 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 

निवडणुकीसाठी 1655 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 35 अर्ज छाननीत अवैध झाले होते. गोषटवाडी, आटोली, आंबेघर तर्फ मरळी, वांझोळे, नेरळे, कवरवाडी, खिवशी, सुरूल, विरेवाडी, वाघजाईवाडी, आंब्रुळे, आडदेव, कोदळ पुनर्वसन, दिवशी बुद्रुक, नाडोली, वाझोली, वजरोशी आणि सळवे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अंशतः बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये नाणेल, पाचगणी, डांगिष्टेवाडी, घाणबी, आंबवणे, कारवट, टोळेवाडी, केर, सांगवड, आसवलेवाडी, टेळेवाडी, जरेवाडी, तामिणे, पाळशी, कोळेकरवाडी, सातर, पाचपुतेवाडी व दुसाळे यांचा समावेश आहे. 

तालुक्‍यातील 107 ग्रामपंचायतीत 809 सदस्यांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी 49 जागांसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही, त्यामुळे त्या जागा रिक्त आहेत. 369 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 476 उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. प्रत्यक्ष 391 जागेसाठी मैदानात 775 उमेदवार रिंगणात आहेत. 72 गावांत राजकीय वातावरण तापणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com