माणमध्ये 47 पंचायतींसाठी चुरशीने मतदान; 724 उमेदवारांचे भवितव्य यंत्रांत बंद

रूपेश कदम
Friday, 15 January 2021

माण तालुक्‍यात 47 ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान झाले. 724 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

दहिवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात 47 ग्रामपंचायतींसाठी आज चुरशीने सुमारे 80 टक्के मतदान झाले. 147 मतदान केंद्रांवर 724 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले असून, यापैकी कोणते 336 उमेदवार निवडून येणार व कोणते उमेदवार पराभूत होणार, या चर्चांना उधाण आले आहे. 

तालुक्‍यातील 14 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 47 ग्रामपंचायतींमध्ये 336 जागांसाठी आज त्यांचे मतदान झाले. 724 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 8,997 मतदारांनी मतदान केले. सरासरी 11.91 टक्के मतदान झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत येळेवाडी येथे सर्वांत जास्त सरासरी 44 टक्के मतदान झाले होते, तर शिंदी खुर्द येथे सर्वांत कमी फक्त दोघांनीच मतदान केले होते.

राजू शेट्टी, सदाभाऊंची तब्बल 47 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता; कऱ्हाड न्यायालयाचा निकाल

साडेअकरापर्यंत मतदानाची टक्केवारी ही 32.11 टक्‍के इतकी झाली होती. साडेतीन वाजेपर्यंत 52,374 म्हणजेच 69.31 टक्के इतके मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत बहुतांशी ठिकाणी 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, तर काही ठिकाणी 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मतदान झाले. संवेदनशील अशा गोंदवले बुद्रुक, राणंद, पिंगळी बुद्रुक, शिंगणापूर, कुळकजाई, वरकुटे म्हसवड, कुकुडवाड या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शरद पवारांचे आत्मचरित्र हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊंचा खोचक टोला

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News 80 Percent Polling For 47 Gram Panchayats In Maan Taluka Today