
सातारा : परिसरातील बंद स्थितीमधील टपऱ्या हटविल्या जाऊ नयेत, यासाठी करंजे भागातील एकाने आज अटोकाट प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे फारसा काही फरक पडला नाही. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हुतात्मा स्मारक ते करंजे या भागातील सुमारे सहा बंद टपऱ्या जप्त केल्या.