महाबळेश्‍वरात वाहनांवर कारवाई; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेचं नागरिकांकडून कौतुक

महाबळेश्‍वरात वाहनांवर कारवाई; मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेचं नागरिकांकडून कौतुक

महाबळेश्वर (जि. सातारा) : पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर महिनोंमहिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला असून, अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही केली आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या या भूमिकेचे शहरातून कौतुक होत आहे.
 
पालिकेने मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारले आहे. हे वाहनतळही पर्यटकांच्या वाहनांना अपुरे पडत आहे. असे असले, तरी या वाहनतळाचा काही नागरिकांनी गैरफायदा उठवण्याच्या उद्देशाने आपली भंगार व नादुरुस्त टाकाऊ वाहने या वाहनतळावर आणून उभी केली आहेत. ही वाहने गेली अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. या वाहनांमुळे पर्यटकांची गैरसोय होत असून, पर्यटकांना आपली वाहने अन्यत्र उभी करावी लागत आहेत. याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन मुख्याधिकारी पाटील यांनी अशा वाहनांवर कारवाईचा निर्णय घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com