जरंडेश्वर कारखान्याच्या आश्वासनानंतर कोरेगाव, कुमठेसह 13 गावांचे आंदोलन स्थगित

राजेंद्र वाघ
Monday, 25 January 2021

उद्या (ता. 26) होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय आंदोलकांच्या वतीने कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सी. आर. बर्गे, हणमंत जगदाळे, पृथ्वीराज बर्गे यांनी आज घेतला.

कोरेगाव (जि. सातारा) : जरंडेश्वर कारखान्याच्या मळीमिश्रित पाण्यामुळे तिळगंगा नदीतील पाणी प्रदूषित झाल्याने कोरेगाव, कुमठेसह 13 गावांच्या संतप्त नागरिकांनी दिलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज जरंडेश्वर कारखाना व्यवस्थापनाने "यापुढे असे होणार नाही व यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल', असे आश्वासन दिल्याने उद्या (ता. 26) होणारे लाक्षणिक उपोषण तात्पुरते स्थगित ठेवण्याचा निर्णय आंदोलकांच्या वतीने कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सी. आर. बर्गे, हणमंत जगदाळे, पृथ्वीराज बर्गे यांनी आज घेतला आहे.
 
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी आज पोलिस ठाण्यात आंदोलनकर्त्या संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक, शेतकऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत जरंडेश्वर कारखान्याचे प्रतिनिधी विजय जगदाळे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह संघर्ष समितीचे सी. आर. बर्गे, शेतकरी संघटनेचे हणमंत जगदाळे, कोरेगाव नगर विकास कृती समितीचे पृथ्वीराज बर्गे, संघटक राजेश बर्गे, संस्कृती प्रतिष्ठानचे अजय बर्गे, सोनेरी ग्रुपचे संतोष नलावडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल जाधव, कापड व्यापारी संघटनेचे राजेश दायमा, राजेश भोसले, संतोष बर्गे, प्रकाश बर्गे, आनंद बर्गे यांच्यासह शेकडो शेतकरी प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

सातारा-सोलापूर बसवर दगडफेकप्रकरणी आटपाडी तालुक्‍यातील पाच संशयित ताब्यात

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Agitations Of 13 Villages In Koregaon Taluka Canceled