कऱ्हाडात पाच ठिकाणी हवा प्रदूषण यंत्रे; प्रा. जालिंदर काशीद यांची माहिती

कऱ्हाडात पाच ठिकाणी हवा प्रदूषण यंत्रे; प्रा. जालिंदर काशीद यांची माहिती
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील नगरपालिकेतर्फे "माझी वसुंधरा' अभियानांतर्गत शहरातील पाच वेगवेगळ्या चौकांत विविध ठिकाणी हवा प्रदूषणमापन यंत्र बसविण्यात आले आहे. त्या सोबत एम्बिएन्ट एअर क्वॉलिटी मॉनिटरिंग यंत्रेही बसविण्यात आली. 

येथील दत्त चौकात सकाळी कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नगरसेवक आणा पावसकर, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, लोकशाही आघाडीचे गट नेते सौरभ पाटील, नगरसेवक सुहास जगताप, नगरसेविका विद्या पावसकर, प्रीतम यादव, अभियंत ए. आर. पवार, एनव्हायरो नेचर फ्रेंडस्‌ क्‍लबचे अध्यक्ष प्रा. जालिंदर काशीद, देवानंद जगताप, चंद्रकांत जाधव, प्रकाश खोचीकर, रमेश पवार उपस्थित होते. ही यंत्रे दत्त चौकासह शहरातील कृष्णा नाका, विजय दिवस, चावडी चौक, पोपटभाई पेट्रोल पंप येथे बसवली आहेत. त्याद्वारे शहरातील वाहनांची संख्या, त्यामुळे होणारे वायू प्रदूषण, त्याचा श्वसनावर होणारा परिणाम आदींची तपासणी केली जाणार आहे. मशिनद्वारे हवेतील धुलीकण व घातक वायू म्हणजे सल्फर ऑक्‍सिड, नायट्रोजन ऑक्‍सिड, नाका वाटे जाणारे धूलीकण व तरंगणारे धूलीकण याचे मोजमाप केले जाणार आहे, असे प्रा. काशीद यांनी सांगितले. त्याचे रिपोर्ट लॅबमध्ये तपासले जाणार असून, त्याचा दोन दिवसांत अहवाल प्राप्त होतो.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com