आर्ट ऑफ लिव्हिंगचे 'सिव्हिल' साठी लाख मोलाचे योगदान

प्रशांत गुजर
Sunday, 18 October 2020

जिल्ह्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सर्व सोयीनयुक्त देण्यात आलेल्या 10 लाख रुपये किंमतीच्या मशीन देण्यात आल्यामुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. 

सायगाव ( सातारा) : कोरोना संसर्गाने जगामध्ये थैमान घातले असताना अनेक संस्था मदतीसाठी पुढे येत आहे. श्री श्री रविशंकर स्थापित आर्ट ऑफ लिव्हिंगची सहयोगी संस्था इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हॅल्यू सातारा जिल्ह्याच्या या संस्थेने सातारा सिव्हील हॉस्पिटलसाठी अत्याधुनिक हाय पलो नेझल केन्यूलाच्या 10 लाख रुपये किंमतीच्या पाच मशीन जिल्हाधिकारी श्री शेखर सिंह व सिव्हील सर्जन सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

श्री श्री रविशंकर यांची आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जागतिक स्तरावर योगा, प्राणायम, ध्यान, ज्ञान व अंतरराष्ट्रीय शांतता या क्षेत्रामध्ये लोकांमध्ये जीवन जगण्याची कला देत असताना कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे येत मोठे पाऊल टाकले आहे. भारतात लाखो लोकांनी जीव गमावला आहे.

या देशात कोरोनाचा सामना करताना आरोग्य यंत्रनेवर मोठा तान पड़त असून शासनही पूर्ण प्रयत्न करत आहे. तरी दवाखान्यात असणारी यंत्रसामग्री व मनुष्यबळ कमी पड़त आहे. ऑक्सिजन बेड व व्हेनटीलेटरच्या कमतरतेमुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

ही गरज ओळखून या संस्थेने रुग्णाला व्हेंटिलेटर न लावता प्रति मिनिट 60 लीटर ऑक्सिजनन देता येतो, तर मशीन सुरु असताना पेशंट बोलू शकतो व चहापाणी देखील करू शकतो, असे हे अत्याधुनिक मशीन रुग्णासाठी जगभरात प्रभावी मशीन म्हणून सिद्ध झाले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सर्व सोयीनयुक्त देण्यात आलेल्या 10 लाख रुपये किंमतीच्या मशीन देण्यात आल्यामुळे जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आज या संस्थेने या मशीन भेट देवून एक चांगला आदर्श घालून दिला आहे, असे सिव्हील सर्जन सुभाष चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी या संस्थेचे प्रदीप खानवलकर, नगरसेवक अमोल मोहिते, धैर्यशील भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या मशीन हॉस्पिटल प्रयत्न पोहचविण्यासाठी अमोल भुजभळ, अभय चव्हाण, शिवदास कदम, सुहास फरांदे, चंद्रकांत जगताप व आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेखर सिंह म्हणाले,  समाजाला शरीर संपदेचे महत्व आपल्या योगा व प्राणायमच्या माध्यमातून पटवून देत असताना आज कोरोनाकाळात जिथे खरी गरज आहे. तिथे उभे राहत, आर्ट ऑफ लिवहिंगच्या या सहयोगी संस्थेने या सर्व सोयीनयुक्त अत्याधुनिक मशीन देवून खऱ्या अर्थाने समाजाची मोठी सेवा केली आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News : The Art of Living affiliate donated five machines worth Rs ten lakh to the Civil Hospital