अर्थमंत्री करणार सरकारी बॅंकांचे खासगीकरण; कऱ्हाडात सीतारामनांविरोधात बॅंक कर्मचारी आक्रमक

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंका आज दुसऱ्या दिवशी संपात सहभागी झाल्या. येथील पूर्वीच्या सिंडीटेक व सध्याच्या कॅनरा बॅंकेच्या शाखेसमोर युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनच्या वतीने शहरातील सात बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या बंदमध्ये सहभाग घेत देशव्यापी संपाला पाठिंबा दिला. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयडीबीआय बॅंकेसह बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक या सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याला बॅंक कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील नऊ विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येत दोन दिवस संप पुकारला आहे. 

शहरातील कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, इंडियन बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, युनियन बॅंक ऑफ इंडिया, युको बॅंक व बॅंक ऑफ महाराष्ट्र या बॅंकातील कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनचे जिल्हाध्यक्ष मारुतराव निकम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. नितीश रावते, प्रफुल मेटांगे, नंदकुमार कुंभार, लिषा चावला, शैलेश कुमार, स्वप्नील डुबल, सतीश कुमार बाजपेयी यांच्यासह बॅंकांचे कर्मचारी सहभागी झाले. सरकारी बॅंकांचे कर्मचारी संपावर गेल्याने काल व आज असे दोन दिवस बॅंकांचे कामकाज ठप्प झाले आहे. मात्र, खासगी बॅंका सुरू होत्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com