esakal | विश्रामगृहाची ताबडतोब दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन; भाजपचा प्रशासनाला कडक इशारा

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

फलटण शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह मोक्‍याच्या ठिकाणी आहे.

विश्रामगृहाची ताबडतोब दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन; भाजपचा प्रशासनाला कडक इशारा
sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून, विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा व तातडीने पावले उचलावीत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, भटक्‍या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, नानासाहेब आडके आदींची उपस्थिती होती. 

फलटण शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह मोक्‍याच्या ठिकाणी आहे. परंतु, जुन्या विश्रामगृहाची इमारत अत्यंत अस्वच्छ असून, तेथील फर्निचरची बिकट अवस्था आहे. रंगरंगोटी अत्यंत वाईट झाली आहे. याबाबत वेळोवेळी दुरुस्तीची मागणी केली. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फलटण शहर हे सातारा-पुणे या रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण आहे. 

पैसे टाका; ऊसतोडणी करा! साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट

पुण्यावरून, मुंबईवरून येणारे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, फलटण हे महानुभाव पंथियांची काशी असल्याने व पंढरपूर, गोंदवले, म्हसवड, शिंगणापूर या ठिकाणची मंदिरे व इतर कार्यक्रमांसाठी जाणाऱ्यांना या ठिकाणी थांबायचे म्हटले तरीसुद्धा त्यांची व्यवस्था येथे होत नाही एवढी भयाण दुरवस्था येथे झाली आहे. लोकप्रतिनिधींना बसण्यासाठीसुद्धा या ठिकाणी जागा उपलब्ध नाही. सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांनाही याठिकाणी एखादी पत्रकार परिषद घ्यायची असेल तर येथे व्यवस्था होऊ शकत नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अहवाल घ्यावा व जिल्हा नियोजनमधून यासाठी आवश्‍यक निधी उपलब्ध करून द्यावा व विश्रामगृहाची दुरवस्था दूर करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे श्री. शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे