वाई-पसरणी घाटात बस उलटून चाकणचे पंधरा प्रवासी जखमी

भद्रेश भाटे
Thursday, 31 December 2020

पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे अवघड वळणावर बस उलटून 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

वाई (जि. सातारा) : पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे अवघड वळणावर बस उलटून 15 प्रवासी जखमी झाले. चाकण येथील सुप्रजित इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वार्षिक सहल प्रतापगड महाबळेश्वरला खासगी बसने आली होती. बसमध्ये 34 प्रवासी होते. 

आज सायंकाळी पावणेसातच्या सुमारास परतीच्या प्रवासाला जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ पालखी रस्त्यावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून खासगी बस (एमएच 14 सीडब्लू 4764) रस्त्यावरच उलटली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बस डोंगराच्या बाजूला नेली, अन्यथा बस दरीत कोसळून मोठी दुर्घटना व जीवित हानी घडली असती. या सर्व घटनेमुळे बस मधील प्रवाशांत एकच गोंधळ उडाला. अपघातात 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून जखमींना वाई व पाचगणी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच, वाई व पाचगणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कऱ्हाडात 100 वाहनांवर पोलिसांची कारवाई

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News Bus Accident In Wai Pasrani Ghat