विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी कोळगेवाडीच्या चौघांवर गुन्हा

राजेश पाटील
Friday, 11 December 2020

मस्करवाडी येथील मनीषा जयेश कोळगे (वय 20) यांचा विवाह 15 जून 2019 रोजी कोळगेवाडी येथे झाला होता. काही दिवसांपासून त्या माहेरी मस्करवाडी (कसणी) येथे राहण्यास होत्या. शुक्रवारी (ता. 4) दुपारी त्यांनी घरात उंदीर मारण्याचे औषध खाल्याने कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

ढेबेवाडी (जि. सातारा) : कोळगेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील विवाहितेने माहेरी मस्करवाडी (कसणी, ता. पाटण) येथे उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी तिच्या पती, सासू सासऱ्यासह चौघांवर काल (गुरुवार) रात्री गुन्हा दाखल केला. मृत विवाहितेच्या आईने याबाबतची तक्रार दिली असून, माहेरातून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसह विविध कारणांना कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचे त्यात नमूद आहे. 

याबाबत पोलिसांची माहिती अशी, मस्करवाडी येथील मनीषा जयेश कोळगे (वय 20) यांचा विवाह 15 जून 2019 रोजी कोळगेवाडी येथे झाला होता. काही दिवसांपासून त्या माहेरी मस्करवाडी (कसणी) येथे राहण्यास होत्या. शुक्रवारी (ता. 4) दुपारी त्यांनी घरात उंदीर मारण्याचे औषध खाल्याने कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी (ता. 6) सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कऱ्हाडात प्रथमच आरटीओ एजंटावर सांगलीच्या एसीबीची कारवाई 

काल मनीषा यांची आई शशिकला बाळासाहेब मत्रे (वय 40) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पती जयेश याच्यासह सासू सुनंदा, सासरे मारुती व नणंद (सर्व रा. कोळगेवाडी) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कऱ्हाड येथे स्वतःच्या गाळ्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरातून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसह आईशी फोनवरून बोलायचे नाही, या कारणावरून मनीषाचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, तसेच 4 तारखेला तिच्या नावावर आलेल्या नोटिशीत तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने तिने विषारी औषध खाऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News A Case Has Been Registered Against Four Persons From Kolgewadi At Patan Police Station