
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांची दहा दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र, काही कारणास्तव श्री. गौडा उशिरा रुजू झाले. परंतु, कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी अर्थ, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, ग्रामपंचायत व इतर विभागांतील अधिकाऱ्यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम व इतर बाबींची बैठकीत सविस्तर माहिती जाणून घेतली.
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी रुजू होताच सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली होती. नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यामुळे "सीईओं'च्या कामाचा धडाका पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना अनुभवता आला.
या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, मुख्य लेखा वित्त अधिकारी विकास सावंत, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर व इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
विनय गौडांनी स्वीकारली सीईओपदाची सूत्रे
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा यांची दहा दिवसांपूर्वी बदली झाली होती. मात्र, काही कारणास्तव श्री. गौडा उशिरा रुजू झाले. परंतु, कार्यभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी अर्थ, सामान्य प्रशासन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, ग्रामपंचायत व इतर विभागांतील अधिकाऱ्यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम व इतर बाबींची बैठकीत सविस्तर माहिती घेतली. प्रामुख्याने कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी उपाययोजना अधिक सक्षम कराव्यात, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी गडचिरोलीचे अजयकुमार बन्सल
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी व कोरोना संक्रमणाच्या काळात सर्व विभागातील अधिकाऱ्यांनी लढा देण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. याचबरोबर जिल्हा परिषदेत विविध विभागात कार्यरत असणारे 626 कर्मचारी बाधित झाल्याने काम करताना कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे