esakal | याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

भांडेवाडीतील पोवई गणेश मंदिर परिसरात देवस्थानने पक्ष्यांसाठी मंदिराच्या आवारात खाद्य व पाण्याची सोय करून एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे.

याला म्हणतात माणुसकी! पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी वाढताहेत हात; पक्षीप्रेमींकडून अन्न-पाण्याची सोय
sakal_logo
By
ऋषीकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, उत्तर खटावमध्ये बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट अंगणात सदैव राहावा, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक पक्षीप्रेमी, तरुण उत्साही आहेत. बहुतांश पक्षीप्रेमींनी आपल्या घराजवळ पाणी व अन्नाची सोय केली आहे. तर काहींनी पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी काहींनी काही प्रयत्न केलेले दिसत आहेत. त्यामुळे या भागात पक्ष्यांची तहान-भूक भागवणारे हात वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहावयास मिळत आहे. 

भांडेवाडी येथील श्री पोवई गणेश मंदिर परिसरात देवस्थानने पक्ष्यांसाठी मंदिराच्या आवारात खाद्य व पाण्याची सोय करून एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे. तर काही पक्षीप्रेमींनी उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच पक्ष्यांकरिता अन्न-पाण्याची सोय करावी, असे आवाहन करणारे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून जनजागृती केली होती. विशेष म्हणजे या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आपापल्या घराच्या आवारात पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय केली आहे. 

जीवापल्याड जपलेली आंब्याची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी; कांदाटी खोऱ्यात 700 झाडे वणव्यात खाक

गतवर्षी अनेकांनी टाकऊ प्लॅस्टिकचे कॅन, बाटल्या कापून त्यात पाणी व दाणे भरून ठेवले होते. पण, प्लॅस्टिक पाहून पक्षी बिचकत असल्याचे निदर्शनास आल्याने यंदा अनेकांनी मातीच्या भांड्यात अन्न-पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कधी काळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी घराघरांतील सकाळ आता पुन्हा एकदा अनुभवयास मिळत असल्याचे अनेकजण बोलून दाखवत आहेत. सध्या, उष्णतेच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची परिस्थिती अवघड बनलेली आहे. त्यांना अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देणे आपले दायित्व आहे. पक्ष्यांची अन्न-पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

Weekend Lockdown : हातात विळा घेत खासदारांनी खपली गव्हाची केली कापणी

चिमण्यांनादेखील हवी असतात माणसं

माणसाजवळ राहणाऱ्या आणि माणसाबरोबर उत्क्रांत झालेल्या चिमणीपासूनच निसर्गाची ओळख मानवाला प्रथम होते. त्यामुळे आपल्या जीवनात चिमणीला विशेष स्थान आहे. चिमण्यांनादेखील माणसं हवी असतात. त्यामुळे चिमण्यांच्या निवाऱ्यासाठी प्रत्येकाने काहीना काही प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. 

निसर्ग सौंदर्याचा खजिना असलेलं उत्तराखंड ऐतिहासिकदृष्ट्याही फेमस; जाणून घ्या देवभूमीचे खास रहस्य

संपादन : बाळकृष्ण मधाळे