साताऱ्यात 23 नोव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश

साताऱ्यात 23 नोव्हेंबरला शाळेची घंटा वाजणार; जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा व्यवस्थापनाला आदेश

सातारा : 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी'चे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12 चे वसतिगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

दि. 23 नोव्हेंबर 2020 पासून इयत्ता 9 वी व 12 वी'चे वसतिगृह, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनां बाबतच्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे : शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे, शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, Thermometer, Thermal Scanner/Gun, Pulse Oxymeter, जंतूनाशक, साबण, पाणी इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता तसेच शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण स्थानिक प्रशासनाने (ग्रामीण व शहरी) सुनिश्चित करावी. वापरण्यात येणारे thermometer हे calibrated contactless infrared digital thermometer असावे. शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण सुनिश्चित करावे. एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णतः निर्जतुकीकरण करावे, क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात किंवा इतर ठिकाणी भरवावी.

शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी 17 ते 22 नोव्हेंबर 2020 या दरम्यान कोविड-19 साठीची RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करावी. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहवे. ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आहेत, त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच कोविड-19 बाबतची लक्षणे आढळल्यास त्यांनी त्वरित चाचणी करावी. सर्व भागधारकांचे त्यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्यांसहित विविध कार्यगट गठित करावे जसे आपत्कालीन गट, स्वच्छता पर्यवेक्षण गट, इत्यादी. शिक्षक, विद्यार्थी व इतर भागधारक या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील. वर्गखोली तसेच स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distancing) च्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था असावी.

शारीरिक अंतरच्या नियमांच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुणा प्रदर्शित करणे. शाळेत दर्शनी भागावर Physical Distancing, मास्कचा वापर इत्यादी संदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे posters/stickers प्रदर्शित करावे. थुंकण्यावरील बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फूट इतके शारीरिक अंतर  राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्हे जसे चौकोन, वर्तुळ इत्यादींचा वापर गर्दी होणारी ठिकाणे जसे पाणी पिण्याच्या सुविधा, हात धुण्याच्या सुविधा, स्वच्छतागृहे इत्यादी ठिकाणी करण्यात यावा. शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. शाळेतील परिपाठ, स्नेह संम्मेलन, क्रीडा व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असेल. शिक्षक-पालक बैठका ऑनलाईन घ्याव्यात. पालकांची संमती विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी वरील विषयी चर्चा करावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहुन देखील अभ्यास करता येईल. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मुल्यांकनाकरिता विशिष्ठ योजना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांनी तयार करण्यात यावी. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सूचनांनुसार, सर्वच कर्मचारी जे (कोविड-19 च्या अनुषंगाने) अधिक उच्च धोक्याच्या पातळीमध्ये आहेत, जसे वयोवृद्ध कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला कर्मचारी व जे कर्मचारी औषध-उपचार घेत आहेत त्यांनी अधिक काळजी घ्यावी. त्यांनी शक्यतो विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात येऊ नये, शाळेतील उपस्थिती व वैद्यकीय रजा याबाबतच्या धोरणांमध्ये सुधारणा करणे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल, असेही जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले आहे. 

शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना 

शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे. शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या व वर्गखोल्यांच्या बाहेरील नेहमी स्पर्श होणारा पृष्ठभाग जसे लॅचेस, अध्ययन-अध्यापन साहित्य, डेस्क, टॅबलेट्स, खुर्ची इत्यादी वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळेतील व शाळेच्या परिसरातील सर्व कचरा नियमितपणे विल्हेवाट लावण्यात यावा. हात धुण्याच्या सर्व ठिकाणी साबण, हॅन्डवॉश व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, शक्य झाल्यास अल्कोहोल मिश्रित हॅन्ड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. शाळेतील स्वच्छतागृहाचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्ग खोल्यांचे नियमितपणे निर्जतुकीकरण करण्यात यावे. शाळेत कोणतीही कृती करताना मास्कचा वापर करावा. तसेच, विद्यार्थी मास्कची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणावे. कोविड-19 संसर्ग टाळण्यासाठी पालकांनी शक्यतो विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तिक वाहनाने शाळेत सोडावे.

शाळेच्या परिसरात चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, ही मुख्यध्यापकांची जबाबदारी असेल. शाळेस एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जातांना सर्व प्रवेशद्वरांचा वापर करावा. शाळेच्या बाहेरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस किंवा समाजातील स्वयंसेवकाची मदत घ्यावी. शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यास रजेवर राहण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करावी. शक्य असल्यास वर्ग खुल्या परिसरात घ्यावेत, शक्य नसल्यास वर्गखोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात, कोणत्याही परिस्थितीत बंद खोल्यांमध्ये वर्ग भरवण्यात येऊ नये. इयत्ता निहाय ऑनलाईन व ऑफलाईन वर्गाचे वेळापत्रक, शिक्षकांची जबाबदारी निश्चिती याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, शक्यतो मुख्य विषय जसे गणित, विज्ञान व इंग्रजी शाळेत शिकवावेत व उर्वरित विषय शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शिकवावेत, प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक असू नये, प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल. शिक्षक, कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळल्यास त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे. तात्काळ रुग्णालय किंवा जिल्हा व राज्य संपर्क क्रमांकास हेल्पलाईन कळवावे. शिक्षकांनी, शालेय समुपदेशकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व आपले मानसिक स्थिरतानिश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे. वरील सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात, असेही जिल्हाधिकारी सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com