esakal | घरगुती समारंभात आटपाडी तालुक्‍यातील पाहुण्यांची मोठी गर्दी; गारुडीत 20 जणांना कोरोनासदृश लक्षणे

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

टेकवस्तीवर आठ-दहा दिवसांपूर्वी एक घरगुती समारंभ झाला होता. त्यासाठी आटपाडी तालुक्‍यातील लिंब वडी येथून पाहुण्यांची गर्दी झाली होती.

घरगुती समारंभात आटपाडी तालुक्‍यातील पाहुण्यांची मोठी गर्दी; गारुडीत 20 जणांना कोरोनासदृश लक्षणे
sakal_logo
By
अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : गारुडी टेकवस्ती (ता. खटाव) येथे दोन स्त्रिया व दोन पुरुष अशा चार व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने सुमारे दीडशे लोकवस्ती असलेली टेकवस्ती हादरून गेली. या वस्तीतील 15 ते 20 जण कोरनासदृश लक्षणाने आजारी असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

टेकवस्ती-गारुडी येथे कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून खबरदारीचा उपाय म्हणून टेकवस्तीवरच आरपीटीसीआर तपासणी कॅम्प घेण्याच्या सूचना केल्या. मायणी प्राथमिक आरोग्य केंद्राने तातडीने हा कॅम्प घेतला. 

Weekend Lockdown Effect : किराणा, औषध दुकानदारांसह किरकाेळ व्यावसायिक बनले लुटारु; सातारकरांची फौजदारीची मागणी 

टेकवस्तीवर आठ-दहा दिवसांपूर्वी एक घरगुती समारंभ झाला होता. त्यासाठी गावातील तसेच आटपाडी तालुक्‍यातील लिंब वडी येथून पाहुण्यांची गर्दी झाली होती. त्यातून कोरोना संसर्ग झाला असण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर गावातील एक बाधित व्यक्ती पाच-सहा दिवस बिनधास्तपणे वस्तीवर फिरत असल्याने कोरोना फैलाव झाला असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुरुकमाने व त्यांचे सहकारी उपचारांसह जागृती करत आहेत. 

कोरेगावातील कोरोना केअर सेंटरसाठी आमदार महेश शिंदेंचे माेठे याेगदान

संपादन : बाळकृष्ण मधाळे