दलित महासंघाचे कऱ्हाडला आंदोलन; मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची मागणी

दलित महासंघाचे कऱ्हाडला आंदोलन; मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाची मागणी
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या उपस्थितीत नुकतेच आंदोलन करण्यात आले. या वेळी बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करावी आणि आण्णा भाऊ साठे महामंडळ पुन्हा सुरू करावे आणि महिलांवर अत्याचार थांबवावे, याही मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 

आंदोलनास प्रा. पुष्पलता सकटे, महासंघाचे राज्य सरचिटणीस प्रकाश वायदंडे, जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, तालुकाध्यक्ष दिलीप सकटे, तालुका संघटक शैलेश भिंगारदेवे, रामभाऊ दाभाडे, राजाभाऊ आवळे, हर्षदा तडाखे, जाई वायदंडे, शांताराम थोरात, भास्कर तडाखे, दिलीप चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी प्रा. सकटे यांनी अनूसुचित जातीला 13 टक्के आरक्षण आहे. अनुसुचित जमातीसाठी सात टक्के, तर ओबीसीसाठी 27 टक्के, एनटीसाठी स्वतंत्र आरक्षण आहे. 

अनुसूचित जातीच्या 13 टक्के आरक्षणात 59 जाती आहेत. त्यातील एकच जात जास्तीतजास्त आरक्षणाचा लाभ घेत आहे. आमचा वाटा आम्हाला मिळत नाही. त्यासाठी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. सरकारने बार्टीच्या धर्तीवर आण्णा भाऊ साठे रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच आर्टीची स्थापना करावी. आण्णा भाऊ साठे महामंडळ बंद आहे. त्यामुळे तरुण, महिला, युवकांना आर्थिक पुरवठा होत होता तो बंद झाला. त्यातून एक पिढी गारद करण्याचे काम झाले आहे. ते महामंडळ सुरू करावे आणि दलित महिलांवरील अत्याचार थांबला पाहिजे, यासाठी आंदोलन करीत आहोत, असे सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com