esakal | नाशिकातील मराठी साहित्य संमेलनाविरुध्द दलित महासंघ आक्रमक

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील घरापासून संमेलनस्थळापर्यंत मोर्चास सुरुवात होईल.

नाशिकातील मराठी साहित्य संमेलनाविरुध्द दलित महासंघ आक्रमक
sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली आहे. अण्णाभाऊंची उपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनात होत असते. त्यांना भारतरत्न किताब देण्याचा ठराव नाशिकच्या संमेलनात करावा, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने नाशिकच्या साहित्य संमेलनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील घरापासून संमेलनस्थळापर्यंत मोर्चास सुरुवात होईल, अशी माहिती दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

बांधकाम विभागाचे पितळं पडलं उघडं; ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर चर बुजविण्याचा दिखावाच! 

यावेळी पारधी मुक्ती आंदोलनाचे प्रकाश वायदंडे, दिलीप सकटे, तालुका उपाध्यक्ष शैलेश भिंगारदेवे, शांताराम थोरात, बहुजन समता पार्टीचे  जिल्हाध्यक्ष रामचंद्र दाभाडे, अशोक बडेकर, राहुल वायदंडे आदी उपस्थित होते. कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील घरापासून संमेलनस्थळापर्यंत मोर्चा नेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे