काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला

काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : शासनाकडून फळबागेकडे वळा असे सांगितले आहे. त्यातून शेतकरी पपईसारखी फळे घेऊ लागला आहे. मात्र, बाजारपेठेत पपईची आवक वाढल्याने पपईला चार ते पाच रुपये दर किलोला मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पपई नाशवंत असली, तरीही दर मिळत नसल्याने आणि पपईच्या तोड्याचाही खर्च निघत नसल्याने दोन आठवड्यांपासून पपईचा तोडाच केलेला नाही. त्यामुळे त्या शेतात तशाच पडून आहेत. 

सातारा जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने उसाची शेती करतात. मात्र, उसाचे पैसे शेतकऱ्यांना वर्षा-दीड वर्षांनी मिळतात. त्यादरम्यानच्या काळात शेतातील काही भागांत शेतकरी कमी कालावधीत उत्पादन मिळेल अशी भाजीपाला, फळभाज्यासह फळांची शेती करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. शासनाकडून शेतकऱ्यांना फळबागेकडे वळा, असे सांगितले जात आहे. त्यातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पपईचे उत्पादन घेतले आहे. त्यातून अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळाले. 

मात्र, अलीकडे शेतकऱ्यांनी काबाडकष्टाने घेतलेल्या पपईची बाजारपेठेत आवक वाढली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतून पपईला मागणी नसल्याने उठाव नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पपईला मिळणारे सात ते 12 रुपये किलोचा दर सध्या चार ते पाच रुपयांवर आला आहे. परिणामी, पिकासाठी घातलेला उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना बॅंका, पतसंस्था आणि सोसायट्यांची कर्ज काढून पपई केली आहे. त्यातच सध्या दर नसल्याने बळीराजासमोर कर्ज कसे भागवायचे हा मोठा प्रश्न आहे. पपई नाशवंत असल्याने पपई जास्त काळ शेतात राहिली, तर ती वाया जाणार आहे. असे असले तरीही पपई तोड्याचाही खर्च सध्याच्या दरातून निघत नसल्याने शेतकऱ्यांनी पपईचा तोडाच दोन आठवड्यांपासून केला नाही. 

शासन सांगतंय फळबागेकडे वळा. त्याप्रमाणे शेतकरी फळबागेकडे वळल्यावर त्याच्या दराची जबाबदारी शासनाने घ्यायला पाहिजे. सध्या पपईला दरच नाही. त्यामुळे उत्पादन खर्च आणि तोड्याचाही खर्च निघत नसल्याने आम्ही दोन आठवडे पपईचा तोडाच केला नाही.'' 
-जयवंत पाटील, शेतकरी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com