आंदोलनाच्या समर्थनार्थ कऱ्हाड, सातारा, सांगलीतील 'बळीराजा'ची फौज दिल्लीला रवाना

आंदोलनाच्या समर्थनार्थ कऱ्हाड, सातारा, सांगलीतील 'बळीराजा'ची फौज दिल्लीला रवाना
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : केंद्र सरकारने केलेलेल्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर 20 दिवसांपासून सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कऱ्हाड, सातारा, सांगली येथील बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संघटेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीला रवाना झाले. 

गोवारे, टाळगाव, ओंड, उंडाळे, सांगली जिल्ह्यांतील आटपाडी, सोलापूर जिल्ह्यातील पटवर्धन कुरोली येथील शेतकरी संघटनांचे पदाधिकारी दिल्लीला रवाना झाले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष मंत्री बच्चू कडू, माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करून पंजाबराव पाटील व संघटनेची फौज घेत श्री. पाटील दिल्लीला रवाना झाले आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com