दिवाळखोरीत गेलेल्या कराड बॅंकेच्या 42 हजार ठेवीदारांचे पैसे परत मिळणार; रिझर्व्ह बॅंकेकडे 400 कोटींचे प्रस्ताव

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : दिवाळखोरीत गेलेल्या कराड जनता सहकारी बॅंकेच्या केवायसी पूर्ण केलेल्या पाच लाखांच्या आतील 42 हजार ठेवीदारांचे तब्बल 400 कोटी रुपये परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बॅंकेचे तब्बल दीड लाख ठेवीदार हे पाच लाखांच्या आतील आहेत. त्यातील 42 हजार ठेवीदारांनी त्यांच्या केवायसी म्हणजे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यांचे प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे दाखल केले आहेत. त्यासोबत बॅंकेच्या पाच वर्षांच्या कामकाजाचे लेखापरीक्षणही सुरू आहे. त्या परीक्षणाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. त्याबाबत शासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे. त्याचा फटका बॅंकेला बसण्याची शक्‍यता आहे. 

बॅंकेच्या 29 शाखाही हळूहळू बंद होत आहेत. बॅंकेचे 32 हजार 269 जणांचे सभासदत्व गोठवले आहे. बॅंकेत ठेवीदारांचे तब्बल 511 कोटी 39 लाख तर एक हजार 727 विविध संस्थांच्या 66 कोटी 94 हजारांच्या ठेवी आहेत. पाच लाखांपेक्षा कमी ठेवीदारांची संख्या दीड लाख आहे. त्यांच्या तब्बल 429 कोटी 43 लाख 67 हजारांच्या ठेवी आहेत. त्यापैकी तब्बल 400 कोटींच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग त्यांचे प्रस्ताव पाठवल्याने मोकळा झाला आहे. बॅंकेच्या कर्जासह ताळेबंदाचे चाचणी लेखापरीक्षण सुरू आहे. सांगलीचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक किरण पाटील त्यांची तपासणी करत आहेत. ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठीचे प्रस्तावांचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवस ते परीक्षण थांबवले आहे, असे अवसायानिक श्री. माळी सांगत आहेत. तर लेखापरीक्षण सुरू आहे, असे लेखापरीक्षक श्री. पाटील सांगत आहेत. त्यामुळे दोघांमध्येही समन्वय नाही, असेच स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात सभासद आर. जी. पाटील हे सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत. 

लेखापरीक्षकांनी नियुक्तीपासून परीक्षण मध्येच थांबवता येत नाही. मात्र, येथे ते थांबल्याचे दिसत असून, ते योग्य नाही. 2017-18 ते बॅंकेची दिवाळखोरी झालेल्या तारखेपर्यंत व गरज भासल्यास त्याही मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण गरजेचे आहे. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी सभासद, ठेवीदारांच्या हिताचा विचार करून ते लेखापरीक्षण गांभीर्याने करण्याची गरज आहे, अन्यथा त्या विरोधातही आंदोलन छेडावे लागेल.'' 

-आर. जी. पाटील, सभासद व सदस्य, कराड जनता बॅंक बचाव कृती समिती 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Arrives at Dare Village
Mumbai-Pune Highway Traffic News
Sambhar and Fawn Captured on Camera
Karad flyover Pune Bengaluru highway
Marathi News Esakal
www.esakal.com