कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस मिळणार 50 लाख; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांस मिळणार 50 लाख; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
Updated on

सातारा : कोरोनामुळेच नव्हे, तर अन्य कोणत्याही कारणाने मृत्यू येणं वाईटच. शासनाने कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, अशा शासकीय कर्मचा-यांकरिता 50 लाखांच्या विम्याची तरतूद केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेंतर्गत ज्या कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना 50 लाखांचा धनादेश देण्यात आला. जिह्यातील पहिलाच हा धनादेश दोन दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयातून देण्यात आली.

कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेले, तर अनेकांनी हाबकी खाल्ली. शासनाने कोरोना बाधित झालेल्यांकरिता औषधोपचाराची सुविधा केली आहे, तसेच ज्या शासकीय कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदतही देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सातारा जिह्यातील पहिल्या कुटुंबास तशा प्रकारची मदत नुकतीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या सहकार्याने 50 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयातून देण्यात आली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

bhuinj police arrest pickup gang involved in cattle theft in wai satara district
Kelghar Ghat Landslide
India Vikram 1 Rocket Success Phaltan Engineer Sanket Kadam Shines in Historic Private Space Mission
Koyna River water release alert
Marathi News Esakal
www.esakal.com