माजी मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेला सोशल मीडियावर जोरदार 'दाद'

हेमंत पवार
Monday, 25 January 2021

सैदापूर येथील कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला आमदार चव्हाण हे आज दुपारी गेले होते.

कऱ्हाड (जि. सातारा) : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सैदापूर (ता. कऱ्हाड) येथे आज दुपारी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना सैदापूर कॅनॉलवर गर्दी दिसली. त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवत स्वतः गर्दीत जाऊन चौकशी केली. एका वृद्धेला रिक्षाने धडक दिल्याने ती जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धेला तातडीने त्यांनी आपल्या वाहनांच्या ताफ्यातील गाडीतून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली. 

सैदापूर येथील कार्यकर्त्याच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला आमदार चव्हाण हे आज दुपारी गेले होते. लग्न सोहळ्यावरून कऱ्हाडला परत येताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. ते गाडीतून उतरले. गर्दीत जाऊन पाहिल्यावर अपघात झाल्याचे समजले. 

भारत माता की जय, वंदे मातरम्‌च्या जयघोषाने दुमदुमला मालवणचा किनारा

एका वृद्धेला रिक्षाने धडक दिली होती. त्यांनी जखमी वृद्धेची (Injured Woman) चौकशी करून तिला तातडीने रुग्णालयात नेण्याची विनंती केली. त्यांच्यासमवेत असलेल्या नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या कारमधून वृद्धेला उपचारासाठी हॉस्पिटलला नेले. पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची परिसरात व सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 

कडक सॅल्यूट! कोरेगावच्या जांबाज पोलिस अधिकाऱ्याचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara News The Injured Woman Was Assisted By MLA Prithviraj Chavan