कराड जनताच्या ठेवीदारांनी कागदपत्रे बॅंकेकडे जमा करावीत : उपनिबंधक माळी

कराड जनताच्या ठेवीदारांनी कागदपत्रे बॅंकेकडे जमा करावीत : उपनिबंधक माळी
Updated on

कऱ्हाड (जि. सातारा) : कराड जनता सहकारी बॅंकेच्या 40 हजार ठेवीदारांसह ग्राहकांनी केवायसी व क्‍लेम फॉर्म जमा केले आहेत. ते फार्म जमा करण्याची अंतिम 31 डिसेंबरपर्यंतची होती. मात्र, त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरितांनी आपली माहिती बॅंकेकडे जमा करावी, असे आवाहन अवसायक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी दिली. 

ते म्हणाले, "कराड जनता सहकारी बॅंकेच्या ठेवी परत मिळविण्यासाठी ठेवीदारांचे क्‍लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ठेवीदारांना फॉर्म भरण्यासाठी आणखी अवधी मिळाला आहे. बॅंकेच्या 40 हजार ग्राहकांनी आपले केवायसी व क्‍लेम फॉर्म जमा केले आहेत. अजूनही फॉर्म जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. बॅंकेच्या विविध शाखांमध्ये याबाबतचे पत्रक लावले आहे. बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडून पुढील सूचना येईपर्यंत फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. 

कराड जनता बॅंकेच्या 5 लाखांच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. बॅंकेचा परवाना रद्द करताना रिझर्व्ह बॅंकेने 5 लाखांच्या आतील ठेवीदारांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यानुसार ठेवी विमा व पतहमी कार्पोरेशनबरोबर झालेल्या चर्चेनंतर बॅंकेतर्फे ठेवीदारांची केवायसी घेण्यात येत आहे. 15 डिसेंबरपासून प्रक्रिया सुरू झाली होती. त्यात आता आणखी दहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अजूनही दीड लाख ग्राहकांच्या केवायसी आलेल्या नाहीत. त्याशिवाय बॅंकेचे 31 मार्च 2020 अखेरचे व 7 डिसेंबर 2020 अखेरचे ऑडिट सुरू आहे. ते ऑडिट पूर्ण होईपर्यंत केवायसी फॉर्म घेण्यास मुदत देण्यात आली आहे. फॉर्म भरल्यानंतरही पुढील प्रक्रियेस आणखी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ती प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com