esakal | साताऱ्याच्या परीक्षकांकडून कराड जनता बॅंकेचे लेखापरीक्षण; आयुक्तांकडून आदेश

बोलून बातमी शोधा

साताऱ्याच्या परीक्षकांकडून कराड जनता बॅंकेचे लेखापरीक्षण; आयुक्तांकडून आदेश}

बॅंकेने दाखल केलेल्या आर्थिक ताळेबंदात बॅंकेला तोटा झाल्याचे नमूद आहे. शासनाच्या वैधानिक लेखापरीक्षणात 352 कोटींचा तोटा झाल्याचा दावा केला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध असतानाही बॅंकेने मार्च 2019 अखेर बॅंकेने तयार केलेल्या आर्थिक पत्रकात सुमारे 64 कोटींची तफावत आढळली होती.

satara
साताऱ्याच्या परीक्षकांकडून कराड जनता बॅंकेचे लेखापरीक्षण; आयुक्तांकडून आदेश
sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कराड जनता सहकारी बॅंकेने दिलेली कर्जे कशी आहेत, त्या कर्जांसह व्यवहारांच्या ताळेबंदात नेमक्‍या काय चुका आहेत. त्यामध्ये दोषी कोण आहे, त्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. साताऱ्याचे शासकीय लेखापरीक्षक विजय सावंत यांची विशेष लेखापरीक्षक म्हणून नेमणूकही केली आहे. श्री. सावंत सोमवारपासून 2008 ते 2012 कालावधीत जनता बॅंकेच्या सर्व व्यवहाराचे लेखापरीक्षण करणार आहेत.
 
बॅंकेने दाखल केलेल्या आर्थिक ताळेबंदात बॅंकेला तोटा झाल्याचे नमूद आहे. शासनाच्या वैधानिक लेखापरीक्षणात 352 कोटींचा तोटा झाल्याचा दावा केला आहे. रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध असतानाही बॅंकेने मार्च 2019 अखेर बॅंकेने तयार केलेल्या आर्थिक पत्रकात सुमारे 64 कोटींची तफावत आढळली होती. त्यासह बॅंकेचे आर्थिक ताळेबंद, त्याचा तोटा, त्यातील तफावत, त्याला कोण जबाबदार आहे, अशा सगळ्याच गोष्टी त्या चाचणी लेखापरीक्षणात तपासल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने ऑगस्ट 2019 मध्येही बॅंकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी दाखल केलेल्या एका फिर्यादीवर चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश झाले होते. मात्र, त्याला स्थगिती आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. 

कर्जदारांच्या 217 कोटींच्या वसुलीचे प्रस्ताव; सहकार कायद्यानुसार उपनिबंधकांचे कारवाईचे पाऊल

बॅंक दिवाळखोरीत गेल्याने सहकार आयुक्तांनी चाचणी लेखापरीक्षणाचे दिलेले आदेश महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामध्ये 2008 ते 2012 या कालवधीत बॅंकेने केलेल्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी विशेष लेखापरीक्षक श्री. सावंत यांची नेमणूक केली आहे. वेळोवेळी दाखवलेला तोटा, सभासदांची केलेली फसवणूक, सादर केलेली आर्थिक पत्रके याची चौकशी होणार आहे. आठ डिसेंबरला बॅंक दिवाळखोरीत निघाली आहे. ती स्थिती असतानाच आता होणारे चाचणी लेखापरीक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. 

जनताच्या संचालकांवर गुन्हे दाखल करा; घोटाळेबाजांविरोधात ठेवीदार समिती आक्रमक

कराड जनता सहकारी बॅंकेने विनातारण केलेले कर्ज वाटप, मोठ्या कर्जदारांची थकलेली वसुली, बॅंकेने दाखवलेला तोटा, प्रत्यक्ष स्थिती, त्यातील तफावत याची तपासणी विशेष लेखा परीक्षणाद्वारे होणार आहे. बॅंक व्यवस्थापनाने दाखल केलेली आर्थिक पत्रकांची चौकशी केली जाणार आहे. 
-विजय सावंत, शासकीय विशेष लेखा परीक्षक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे