esakal | जीवापल्याड जपलेली आंब्याची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी; कांदाटी खोऱ्यात 700 झाडे वणव्यात खाक

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

लामज हे छोटेसे गाव असून, या गावातील प्रदीप कदम या युवकाच्या शेतात पाच वर्षांची रत्ना आंब्याची 150 झाडे, चार वर्षांची हापूस आंबा 50 झाडे आहेत.

जीवापल्याड जपलेली आंब्याची बाग आगीच्या भक्ष्यस्थानी; कांदाटी खोऱ्यात 700 झाडे वणव्यात खाक
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : कोयना जलाशयापलीकडे असणाऱ्या कांदाटी खोऱ्यातील लामज (ता. महाबळेश्वर) येथील शेतकरी प्रदीप सखाराम कदम यांनी कष्टाने फुलवलेली आंब्याची तसेच इतर झाडांची बाग अज्ञाताने लावलेल्या वणव्याच्या आगीने होरपळून गेली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, लामज हे छोटेसे गाव असून, या गावातील प्रदीप कदम या युवकाच्या शेतात पाच वर्षांची रत्ना आंब्याची 150 झाडे, चार वर्षांची हापूस आंबा 50 झाडे आहेत. तसेच चिकू, काजू, खैर, नारळ, साई सरबत्ती निंबू प्रत्येकी दहा अशा सुमारे 300 फळझाडांची लागवड केली आहे. त्यांनी ही झाडे आपल्या मुलाप्रमाणे जपली होती. परंतु, अज्ञाताने लावलेल्या वणव्यात ही वनसंपदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने श्री. कदम यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. 

नगराध्यक्षांकडून लोकशाहीचा खून; अफजल सुतारांचा घणाघात

जीवापलीकडे जपलेली ही बाग आता फळाला आली होती. यापासून आता उत्पन्न सुरू होणार होते, तोच या संकटाने कदम यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या अज्ञाताने आग लावली असेल, त्याला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे. हजारो रुपये खर्च करून मी जीवापलीकडे जोपासलेल्या फळबागेतील हिरवी गर्द झाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक स्त्रोत सुरू होण्याअगोदर मातीमोल झाल्याने मी आर्थिक संकटात सापडलो आहे. वणवा लावणाऱ्यांवर कडक शासन व्हायला हवे, असे श्री. कदम यांनी सांगितले. 

एसपींपासून आयजीपर्यंत सर्व पोलिसांना माझे सांगणे आहे, आम्ही टॅक्‍स भरतो म्हणून तुमचे पगार होतात

संपादन : बाळकृष्ण मधाळे