esakal | 'आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवा'; खंडाळ्यात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवावी, या मागणीसाठी खंडाळ्यात मराठा क्रांती मोर्चाकडून बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले.

'आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवा'; खंडाळ्यात मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवावी व इतर मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयासमोर खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. 

या वेळी शाळकरी मुलींचे शिवगाण उपोषणस्थळी घेण्यात आले. या वेळी अनेकांनी उपोषणस्थळी भेट दिली. या साखळी उपोषणास संतोष देशमुख, जितेंद्र गाढवे, तानाजी गाढवे, गणेश गाढवे, सौरभ गाढवे, शिरीष गाढवे, संदीप ननावरे, मयुर शिर्के, प्रशांत जंगम, सुरज साळुंखे, निखिल खंडागळे यांनी सहभाग नोंदवला. 

हे पण वाचा- थोडं फार होणारच! उदयनराजेंनी गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोडले मौन

शिवसंस्कार ग्रुप पारगाव यांनी पोवाडा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त केले. या साखळी उपोषणास गाववार नियोजन केले आहे. दरम्यान, 15 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात तालुक्‍यातील सर्व गावागावात फिरुन जनजागृती करण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे