
सातारा : क्षेत्र महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या सर्व नद्या प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या संबंधित सर्व विभागांची आढावा बैठक महाबळेश्वरात घेऊन येथील सर्व नद्यांच्या प्रदूषणाबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदलमंत्री भूपेंद्र यादव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.